पश्चिम महाराष्ट्रात लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात आला

केंद्र सरकारकडून करोना लसीकरणाला आपत्कालीन परिस्थितीसाठी  मान्यता.PRESS MEDIA LIVE : 

केंद्र सरकारकडून कोरोना लसीकरणाला आपत्कालीन परिस्थितीसाठी मान्यता देण्यात आली असून, प्रत्यक्ष लसीकरणावेळी अडचणी येऊ नयेत, यासाठी दुसऱया टप्प्यात आज पश्चिम महाराष्ट्रात लसीकरणाचा 'ड्राय रन' घेण्यात आला. यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात लसीकरण करण्यात येणाऱया आरोग्य कर्मचाऱयांना लस कशाप्रकारे देण्यात येणार, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. नगर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्हा प्रशासन लसीकरणासाठी सज्ज असल्याचे त्या-त्या जिह्यांच्या जिल्हाधिकाऱयांनी सांगितले आहे.

राज्य शासन आणि आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नगर जिह्यात महानगरपालिका आणि ग्रामीण भागात या लसीकरण मोहिमेचे प्रात्यक्षिक झाले.आज सकाळीच जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी महानगरपालिकेच्या तोफखाना नागरी आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील लसीकरण सरावफेरीची पाहणी केली. निवड केलेले लाभार्थी, त्यांची नोंद, त्यानंतर लसीकरणाची प्रक्रिया, त्यांची कोविन ऍपवर नोंदणी, लसीकरण झाल्यानंतर लाभार्थ्याला पहिले लसीकरण झाल्याबाबत त्याच्या मोबाईलवर आलेला संदेश ही सर्व प्रक्रिया जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्वतः पाहिली. तेथील नियोजनाबाबत काही सूचनाही दिल्या. ग्रामीण भागातील वाळकी (ता. नगर) येथे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी भेट दिली.

सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील सर्कसाधारण रुग्णालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत कोकिड लसीकरणाचा ड्राय रन झाला. कराड येथील केणूताई चक्हाण उपजिल्हा रुग्णालयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत कोकिड लसीकरणाचा ड्राय रन झाला. पाटण तालुक्यातील मल्हार पेठ येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या उपस्थितीत कोकिड लसीकरणाचा ड्राय रन झाला.


सोलापूर जिह्यात कोरोना लस देण्याबाबत जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, आज शासनाच्या निर्देशानुसार चार ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन पार पडला. लसीकरण करताना येणाऱया अडचणींचे वैद्यकीय अधिकाऱयांसोबत निरीक्षण केले, त्यानुसार प्रत्यक्ष लसीकरण करताना योग्य नियोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. आज जिह्यात उपजिल्हा रुग्णालय, अकलूज, ग्रामीण रुग्णालय, बार्शी, प्राथमिक आरोग्य केंद्र होटगी आणि महापालिका क्षेत्रात दाराशा हॉस्पिटल येथे कोविड लसीकरणाबाबतचा ड्राय रन घेण्यात आला.

सांगली जिह्यात जानेवारीच्या अखेरीस कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर ती कशी द्यायची? काय खबरदारी घ्यायची याची रंगीत तालीम ईश्वरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आली. कवलापूर व सांगली (हनुमाननगर) येथे ही रंगीत तालीम घेण्यात आली.

Post a comment

0 Comments