राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर आज अडविले



PRESS MEDIA LIVE : 

 कोल्हापूर : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर आज अडविले. महाराष्ट्र- कर्नाटक सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात निघाले होते.

दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र- कर्नाटक सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर मंत्री बेळगावकडे निघाले होते. मात्र कर्नाटक पोलिसांकडून त्यांना कर्नाटकच्या सीमेवर अडविण्यात आले आहे. कोगनोळी टोल नाक्यावर पोलिसांनी त्यांचा ताफा रोखला. यावेळी राज्यमंत्री यड्रावकर आणि कर्नाटक पोलिसांमध्ये पोलिसांच्या या कारवाई विरोधात राज्यमंत्री यड्रावकर यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणबाजी केली.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव आणि सीमाभागासाठीची न्यायालयीन लढाई नक्कीच जिंकू आणि बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात येईल, असा विश्वास आम्हाला वाटतो आम्ही हुतात्म्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही, असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले.

कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध

राज्यघटनेनुसार देशाच्या कोणत्याही भागात जाण्याचा सामान्य नागरिकांचा हक्क आहे, मात्र देशाचे गृहमंत्री अमित शाह बेळगावात येत असताना तो हक्क नाकारला जात असल्याने आम्ही कर्नाटक पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करतो, असे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.

राज्यमंत्री यड्रावकर आणि कर्नाटक पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. पोलिसांच्या या कारवाई विरोधात यड्रावकर यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणबाजी केल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला. बाचाबाची झाली.

Post a Comment

Previous Post Next Post