बेडकिहाळ मध्ये काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष

 बेडकिहाळमध्ये कॉंग्रेसच्या विजयाचा जल्लोस

PRESS MEDIA LIVE : (बेळगाव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी ) :


बेडकिहाळ ग्राम पंचायत निवडणूकीमध्ये कॉंग्रेस ने बी.जे.पी‌. ला धुळ चारली २९ उमेदवार पैकी कॉंग्रेस च्या २३ उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला.

   सन्मानित जेष्ठ नेते गोपाळदादा पाटील  यांच्या नेतृत्वामध्ये बेडकिहाळ ग्राम पंचायत निवडणूकीमध्ये २९ उमेदवार पैकी २३ उमेदवार विजयी करुन इतिहास रचला. सन्मानिय गोपाळदादा पाटील हे सर्व कार्यकर्तेंना घेऊन दिवस रात्र प्रत्येक वार्डामध्ये जाऊन उमेदवारांना भेटीगाठी करुन ग्राम पंचायतीवर कॉंग्रेसचा झेंडा लावला. प्रत्येक समाजाच्या मुख्य नेत्यांना घेऊन तसेच संघ संघटना व महिलांना घेऊन हजारोंच्या संख्येने बी.जे.पी.  ला धक्का देण्यासाठी विजयी रॅली सुध्दा संपूर्ण गावातून काढन्यात आली. संपूर्ण गाव कॉंग्रेसमय केले.

     गेल्या सहा महिन्यांपासून बेडकिहाळ ग्राम पंचायतीच्या निवडणुकीची तयारी  ही तरुणासारखे नेत्रुत्व असनारे गोपाळदादा पाटील हे सर्व उमेदवार व प्रुमुख नेत्यांना विचारात घेऊन  तयारी करत होते. महिला आघाडीच्या माजी आमदार काकासाहेब पाटील यांची सुकन्या व गोपाळदादा पाटील यांची सुन सौ. सुप्रिया दत्तकुमार पाटील यांनी संपूर्ण बेडकिहाळातील महिलांना घेऊन विजयाची मानकरी ठरल्या. संपूर्ण गावातून विजय रॅली श्री. गणेश मंदिर पासुन ते श्री. ग्राम दैवत श्री.सिध्देश्वर मंदिरा पर्यंत जाऊन दर्शन घेतले. तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.  तेथुन विजयी उमेदवार व गावातील सर्व कॉंग्रेसचे थोर नेते  तसेच युवा कार्यकर्ते व महिला या रॅली मध्ये उपस्थित होते. ही रॅली बेडकिहाळ परिसरात सर्व कार्यकर्तेनीं गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या आतीषबाजी करत जल्लोष केला. या रॅली मध्ये पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. रॅलीची सांगता गणेश मंदिर राम नगर मध्ये केली. त्यावेळी जेष्ठ नेते सन्मानिय गोपाळदादा पाटील यांनी मतदारांचे आभार मानले. गावाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.  प्रत्येक वार्डामध्ये वीकासाची गंगा आनल्याशिवाय रहानार नाही. असे मार्गदर्शन उमेदवारांना केले. गावातील अवैध धंदे पहिल्याच ग्राम पंचायत मिंटीगमध्ये घालून बंद करनार आहे. गावाच्या विकासासाठी अनेक निधी गावाच्या विकासासाठी आनन्यासाठी पराकाष्ठा करनार आहे. 

  तसेच पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष विक्रम  शिंगाडे यांनी सुध्दा आपल्या मनोगतामध्ये गावाच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेन्यास सगळ्यांबरोबर एकजुटीने काम करुन गावाच्या विकासासाठी पराकाष्ठा करनार असल्याचे सांगितले. त्यावेळी गावातील सर्व नेते, युवा नेते व महिला उपस्थित होत्या.

Post a comment

0 Comments