*28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाले



इचलकरंजीची. सन 2019-20 ची वार्षिक सर्वसाधारण सभा शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टंसिंग पळून व सॅनिटायझर, मास्कचा वापर करून रविवार दिनांक 17 जानेवारी 2021. रोजी खोतवाडी येथील गौरीशंकर नगर येथील श्री दानेश्वरी व श्री वीरभद्र मंदिराच्या सांस्कृतिक हॉलमध्ये अतिशय खेळीमेळीत संपन्न झाली. प्रथम महात्मा बसवेश्वरांच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर कोरोना काळामध्ये देशभरातील निधन झालेल्या डॉक्टर्स,नर्सेस, पोलीस कर्मचारी त्याचबरोबर समाजातील ज्या व्यक्तीचे निधन झाले. व मंदिरासाठी ज्यांनी जागा दिली असे राजूभाई पाथरवट या सर्वांच्या दुःखद निधना बद्दल श्रद्धांजली वाहण्यात आले. यानंतर समाजातील बंधू भगिनींचे व सभासदांचे आणि मान्यवरांचे स्वागत राजू चचडी यांनी केले. प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष श्री शिवकुमार मुरतले सर यांनी केले प्रास्ताविकामध्ये मंडळाच्या 28 वर्षाची वाटचालीचा आढावा घेण्यात आला. व अहवाल सालामध्ये केलेल्या विविध उपक्रमांचा सविस्तर वृत्तांत सांगण्यात आले. यानंतर अहवाल वाचन मंडळाचे सेक्रेटरी श्री इराण्णा मट्टीकल्ली यांनी केले.अहवाल सालातील झालेला जमा-खर्चाचे सविस्तर वृत्तांत वाचून दाखविले. सन 2020- 21च्या अंदाजपत्रकीय खर्चास मंजुरी घेण्यात आली. 

       यानंतर अहवाल सालामध्ये समाजातील 10वी,12वी परीक्षेमध्ये तसेच विविध स्पर्धेमध्ये यश संपादन केल्याबद्दल गुणी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते या सर्व मुलांचे शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले. कु.विशाखा शंकर बिळ्ळूर हीचा सत्कार महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.सुरेखा बळीफडी यांच्या हस्ते करण्यात आले. व कु. रेवती चिदानंद हालभावी हिचा सत्कार सौ. उमा कोळकी यांच्या हस्ते करण्यात आले. समृद्ध चिदानंद हालभावी याचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष वज्रकांत कोळकी यांच्या हस्ते करण्यात आले. कु.अनुष्का अमृत मट्टीकल्ली हिचा सत्कार सौ.भारती घुणकी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रज्वल आनंद हेरलगी याचा सत्कार मंडळाचे संचालक राजू चचडी यांचे हस्ते करण्यात आले. ओम प्रकाश वरदाई याचा सत्कार मंडळाचे सेक्रेटरी इराण्णा मट्टीकल्ली यांचे हस्ते करण्यात आले. कु. वैष्णवी रमेश कराडकर हिचा सत्कार सौ कविता बाळीफडी यांचे हस्ते करण्यात आले. तन्मय शिवानंद हालभावी याचा सत्कार श्री सुभाष घुणकी यांचे हस्ते करण्यात आले. व रोहन रमेश कराडकर याचा सत्कार श्री महेश कब्बूर यांचे हस्ते करण्यात आले. यश कराडे याचा सत्कार करण्यात आले. त्याचबरोबर आपल्या मंदिराच्या बांधकामासाठी शिवानंद जोतावर यांच्या आजी श्रीमती भागव्वा गुरुपदप्पा होरोटी  यांनी 51000/- रुपये देणगी दिल्याबद्दल शिवानंद जोतावर यांचा सत्कार मंडळ मार्फत करण्यात आले. तसेच आपल्या समाजाचे अध्यक्ष वज्रकांत कोळकी  यांच्या मातोश्री स्वर्गवासी झाल्यानंतर त्यांनी आपल्या आईच्या अंगावरील दागिने समाजाच्या मंदिराच्या बांधकामासाठी म्हणून दिले त्याची रक्कम 85000/- इतकी झाली त्या बद्दल श्री कोळकी त्यांचा सपत्नीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर मनोगतामध्ये सौ.उमा कोळकी यांनी महिला मंडळातील झालेल्या उपक्रमाचा आढावा सांगितला व युवक मंडळाचे अध्यक्ष श्री शिवानंद यांनी आपल्या मनोगतामध्ये जमाखर्चाचा अहवाल असावा असे मत व्यक्त केले.

शेवटी अध्यक्षीय भाषणामध्ये उपाध्यक्ष श्री शिवकुमार मुरतले  यांनी काम करणारा माणूस हा कोठे ना कोठे तरी चुकत असतो त्या चुका दुरुस्त करून पुढे जावूया यासाठी एका चित्रकाराची छोटीशी कथा सांगितले चुका काढण्या पेक्षा  चुका दुरुस्त करायला शिकूया त्यांनी गोष्टीतून सांगितले. तसेच माणसे जोडायला शिकूया यासाठी दुसरी एक छोट्या खट्याळ लहान मुलांची गोष्ट सांगून माणसे जोडली की जग आपोआप जोडले जाईल याकरता एक छोटी गोष्ट सांगितली व सर्वांनी मिळून एकोप्याने काम करूया ही भावना व्यक्त केले. व जास्तीत जास्त संख्येने सर्व कार्यक्रमांमध्ये कसे उपस्थित राहता येईल हे सांगण्याचा प्रयत्न केला. एकटा माणूस काही करू शकत नाही सर्वजण मिळून काम केले तर लवकर व चांगलं पारदर्शक कार्यकर्ता येते.व एकीचे बळ कसे असते याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.आभार प्रदर्शन शिवानंद जोतावर यांनी केले या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व समाजबांधव, सभासद व गुणीजन विद्यार्थी, सत्कारमूर्ती तसेच मान्यवर महिला मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी, युवक मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी सर्व समाजातील बांधू भगिनी यांचे आभार मानले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ राखी शिवकुमार मुरतले यांनी केले.

         हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी समाजातील सर्व संचालक मंडळ,तसेच अध्यक्ष वज्रकांत कोळकी, उपाध्यक्ष शिवकुमार मुरतले, सेक्रेटरी इराण्णा मट्टीकल्ली,

खजिनदार चिदानंद हालभावी, प्रमोद हालभावी, राजू चचडी, सुभाष घुणकी, प्रकाश वरदाई,

शंकर बिळ्ळूर, महेश कब्बूर, सुनील चचडी, राजू भाविकट्टी, शिवानंद जोतावर, नंदू हेरलगी, संतोष हारूगेरी, राजू हारुगेरी प्रकाश बाळीफडी, महेश बाळीफडी, विजय बाळीफडी, बसवराज मुरतले, मल्लिकार्जुन बिळ्ळूर, मनोज चचडी, कराडे चिखले, पट्टन, इत्यादी.व

महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.सुरेखा बाळीफडी, सौ उमा कोळकी, सौ कविता बाळीफडी, सौ.भारती घुणकी, सौ. गीता बाळीफडी, सौ.नंदा हलभावी, सौ. राखी मुरतले, सौ.प्रिया वरदान, सौ गायत्री मुरतले, सौ.चिखले, सौ.पट्टन, सौ.शालिनी हालभावी इत्यादी महिला मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post