इचलकरंजी : आम्हाला भीख नको आमच्या हक्काचा निधी हवा.

 आम्हाला भीक नको आमच्या  हक्काचा  निधी हवा.

PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :आनंद शिंदे :


देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी  अपंग व्यक्तींना संरक्षण आणि अनेक उन्नतीसाठी विशेष कार्यक्रम हाती घेऊन उपक्रम राबवत असताना  देखील  इचलकरंजी नगरपालिका मध्ये भाजपची सत्ता असताना सुद्धा आमच्या हककाचा  निधी मिळत नाही हे आमचे दुर्दैव.  आम्हाला दुदैवाने अपंगत्व आले म्हणून आमच्या ५ टक्के निधी साठी भीक मो मागावी  लागत आहे. अशा प्रकारे अपंग व्यक्तींना वागणूक दिली जात आहे .इचलकरंजी शहरा मध्ये अनेक संघटनानी या निधी साठी व अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलने करण्यात आले परंतु गेंड्याच्या कातड्यासारखे सत्याधारी वागत आहेत. महाराष्ट्र मध्ये इचलकरंजी श्रीमंत नगरपालिका समजली जाते पण या श्रीमंत नगरपालिका ला अपंग चा निधी सुद्धा  आता कमी प डू लागला  आहे . याच्या सारखे दुर्दैव दुसरे काय . आमच्या हक्काचा निधी मिळावा  या साठी आम्हाला अपंग व्यक्तीं सारखे नगरपालिका दारात बसून भिक  मागावी लागत आहे.  त्याचं बरोबर आता  महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री श्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना भेटून त्यांना अनेक मागण्याचे निवेदन देऊन चर्चा करण्यात येणार आहे.

या बैठकीत  मध्ये अनेक संघटना चे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments