कामगार संघटना संयुक्त कृती समिती चा मेळावा संपन्न*

15 दिवसात मजुरी वाढीची अंमल बजावणी न झाल्यास कृती समितीही करारातून बाहेर पडणार कृती समितीची घोषणा 

(हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले)

इचलकरंजी =आज गुरुवार दिनांक 28/01/21 रोजी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा यंत्रमाग कामगारांची वाढीव मजुरी ताबडतोब द्या,जोबर , कांडी वाली, दिवाणजी यांना 10 टक्के पगारवाढ द्या या मागण्यासाठी समाजवादी प्रबोधिनी येथे मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात अध्यक्ष स्थानी कॉ, भरमा कांबळे होते,

    यावेळी बोलताना भरमा कांबळे यांनी घोषणा केली की, जर मालकांनी येणाऱ्या 15 दिवसात घोषित मजुरी वाढीची अंमलबजावणी न केल्यास कामगार आणि कामगार संघटना मजुरी वाढी चे करारातून बाहेर पडणार, तसेच याबाबतचे निवेदन मा आमदार प्रकाश आवाडे साहेब यांना दिनांक 1/2/21 रोजी देणार आहोत, आणि येत्या 12/02/21 रोजी इचलरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे घोषित करण्यात आले, या मेळाव्यात कृती समितीच नेते शामराव कुलकर्णी, राजेंद्र निकम, हणमंत लोहार, धोंडीबा कुंभार, रियाज जमादार, शिवानंद पाटील, बंडा सातपुते, सुभाष कांबळे, राहुल दवडते, सुनिल बारवाडे, सदा मला बादे, शिवाजी भोसले इत्यादी कामगार नेते यांची भाषणे झाली, मेळाव्याला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a comment

0 Comments