महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट ची मीटिंग संपन्न महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट चे पुणे शहर अध्यक्ष पदी रमजान शेख.

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील.    अध्यक्ष नदीम मुजावर.


PRESS MEDIA LIVE : पुणे : 

पुणे :. महाराष्ट्र मुस्लीम फ्रंट ची नुकतीच बैठक होऊन पुणे शहर अध्यक्ष पदी रमजान शेख यांची एकमताने निवड करण्यात आली. नूतन अध्यक्ष  रमजान शेख यांनी  संघटनेच्या माध्यमातून  सर्वसामान्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.  पुणे शहर महिला अध्येक्षा अफसा अन्सारी यांनी कोंढवा भागातील अडचणी बाबतचा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित करून संघटनेचे लक्ष वेधून घेतले. या बाबत निर्णय होऊन सर्वांची  कामे व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न सर्वाँना प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले. 

   महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  रशीद शेख यांनी  संघटनेचे काम वाढले पाहिजे , प्रत्येक महिन्याला मीटिंग झाली पाहिजे तसेच मीटिंग ला लोकांची संख्या वाढत गेली पाहिजे असे सांगीतले. सर्वांची  कामे केली जातील असे ही रशीद शेख यांनी सांगीतले.  महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट चे संस्थापक अध्यक्ष नदीम मुजावर यांनी सुद्धा संघटनेचे कामकाज वाढले पाहिजे, कोणाचे कोणतेही काम असो ते सोडविण्यासाठी आम्ही सर्वच जन दिवस रात्र एक करू. या संघटनेचा व  राजकारणाचा काहीही संबंध नसल्याचे शेवटी सांगीतले. 

     पुणे जिल्हा अध्यक्ष सुलतान नाजा कव्वाल यांनी  संघटनेच्या कामात लक्ष घालून संघटना वाढीसाठी  जोरदार प्रयत्न करणार असल्याचे या वेळी  ठासून सांगीतले.   या मीटिंग मध्ये  संघटनेचे असंख्य  कार्यकर्ते व असंख्य महिला वर्ग  उपस्थित होता.

   प्रास्ताविक  संघटनेचे  कार्याध्यक्ष शहाबुद्दीन शेख यांनी केले, तर सूत्रसंचालन इरफान शेख यांनी केले.  या  मीटिंग ला  महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट चे सर्व कार्यकारणी , पदाधिकारी उपस्थित होते. 

प्रसिद्ध समाज सेवक मजहर शेख यांचा  विशेष सत्कार या वेळी पुणे शहर महिला अध्यक्ष अफ शा अन्सारी यांनी केला.  तर संघटनेचे  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रशीद शेख व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नदीम मुजावर यांनी मजहर शेख यांना नेहमी आपल्या सोबत ठेवणार असल्याचे सांगितले.

या वेळी पुणे जिल्हाध्यक्ष सुलतान नाजा , प्रेस मीडिया चे संपादक मेहबूब  सर्जेखान,  मेरा भारत टाईम्स चे संपादक उस्मान कादरी व हैदर कादरी यांचा सत्कार  करण्यात आला,


Post a comment

0 Comments