पुणे चार जानेवारी पासून

पुणे :  चार जानेवारी पासून नववी ते बारावी शाळा सुरू होणार 


PRESS MEDIA LIVE : पुणे : मोहम्मद जावेद मौला :

रोना व्हायरस महामारीमुळे मार्च महिन्यापासून बंद असणाऱ्या शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागील महिन्यात घेतला होता. सोबतच, शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपविण्यात आला होता. यानंतर अनेक महापालिकांनी आपल्या क्षेत्रातील शाळा सुरु करण्याचा निर्णय पुढे ढकलला होता.

आता नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात पुण्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुणे महापालिका क्षेत्रात असलेल्या 9वी ते 12वीच्या शाळा 4 जानेवारीपासून सुरु करण्याचे आदेश पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.शाळा सुरु होणार असल्या तरी या काळात कोरोना प्रतिबंध सर्व अटी शर्थींचे पालन करावे लागणार आहे.

शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करण्यासाठी थर्मल स्कॅनर किंवा थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक, साबण, पाणी या आवश्यक वस्तू शाळा प्रशासनाने ठेवणं बंधनकारक आहे. शाळा वाहतूक सुविधांचेही निर्जंतुकीकरण नियमित करण्यात यावं. याबाबत उपाययोजना करणं आवश्यक आहे. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड १९ साठीची RTPCR चाचणी बंधनकारक आहे

Post a Comment

Previous Post Next Post