पदवीधर शिक्षक संघाची मतमोजणी सुरू.

 विधापरिषदेच्या 3 पदवीधर , 2 शिक्षक मतदार संघाची मतमोजणी सुरू. 

पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आघाडीवर.

PRESS MEDIA LIVE : मुंबई :

मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या तीन, पदवीधर दोन शिक्षक मतदारसंघासाठी आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी दि. एक डिसेंबरला मतदान झाले. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादर संघासाठीचे मतदान झाले. आज या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे.


राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. यानंतर ही पहिली मोठी निवडणूक होती. महाविकास आघाडीने म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मिळून उमेदवार दिला होता. यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने ताकद पणाला लावली होती.विधानपरिषदेच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी राजकारणावर परिणाम दिसेल. तसेच काय निकाल लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर धुळ्यात भाजपचा दणदणीत विजय झाला आहे.

धुळ्यात भाजपचा विजय
धुळे नंदुरबारमध्ये भाजपच्या अमरीश पटेलांनी विजय मिळवला आहे. हा महाविकास आघाडीच्या बॅनरखाली निवडणूक लढणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेला मोठा धक्का आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा तब्बल 234 मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. धुळे-नंदुरबारमधून भाजपचे अमरीश पटेलांनी विजय मिळवला. त्यांना 332 मते मिळाली आहेत. तर, पटेल यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांना अवघ्या 98 मतांवर समाधान मानावे लागले आहे.

पुणे : पदवीधर मतमोजणीला सुरुवात 3 वाजता सुरुवात
पुणे पदवीधर मतमोजणीला 3 वाजता सुरुवात झाली आहे. दरम्यान, प्रथम पसंतीचे प्राथमिक कल हाती आले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आघाडीवर आहेत, तर भाजपचे संग्राम देशमुख पिछाडीवर आहेत. दुसरीकडे, पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे जयंत आसगावकर यांची आघाडी कायम आहे.
अमरावती मतमोजणीस सुरुवात
विलासनगर येथील शासकीय गोदाम येथे असलेल्या मजमोजणी स्थळी आज सकाळी सहा वाजता सर्व अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. सर्वांना पुन्हा त्यांची जबाबदारी समजावून देण्यात आली. त्यानंतर सुरक्षा कक्षाचे सील तोडून मतपेट्या मतमोजणी कक्षात हलवण्यात आल्या. निवडणूक निरीक्षक आनंद लिमये, निवडणूक निर्णय अधिकारी पीयूष सिंह यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित आहेत. पहिल्या टप्प्यात मतपत्रिकांचे गठ्ठे बनवणे, सरमिसळ आदी कामे होत आहेत.

प्रत्येक मतदारसंघात किती झाले होते मतदान?
मतदारसंघनिहाय औरंगाबाद पदवीधर 61.08 टक्के, पुणे पदवीधर 50.30 टक्के, नागपूर पदवीधर 54.76 टक्के, अमरावती शिक्षक मतदारसंघ 82.91 टक्के, पुणे शिक्षक मतदारसंघ 70.44 टक्के तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे 99.31 टक्के मतदान झाले. त्यामुळे मतदारांचा कौल कुणाला मिळणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post