मुंबई पुणे एक्स्प्रेस :

 

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवास सुपर फास्ट होणार.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मार्गाची पाहणी करणार.



PRESS MEDIA LIVE : 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवास सुपरफास्ट होणार आहे. खोपोली ते पुसगाव येथे नवीन मार्गिकेचे काम प्रगतिपथावर असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी 10 डिसेंबर रोजी या मार्गिकेची पाहणी करणार आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोली ते खंडाळादरम्यान नवीन मार्गिकेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गावर उभारण्यात येणारा केबल स्टड पूल हे पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. यामुळे प्रवासासाठी लागणारा वेळही कमी होणार असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या दुपारी 2.50 वाजता करणार आहेत.

रत्नागिरीतील पोफळी प्रकल्पाची करणार पाहणी
रत्नागिरी जिह्यात पोफळी जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येत असून या प्रकल्पाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी 10.00 वाजता करणार आहेत . पोफळी जलविद्युत प्रकल्पातील विद्युतगृहाचीही पाहणी मुख्यमंत्री यावेळी करणार आहेत .

साताऱ्यात कोयना धरण व परिसराची पाहणी
मुख्यमंत्री ठाकरे 12 वाजण्याच्या सुमारास साताऱ्यात पोहोचणार आहेत . या ठिकाणी ते कोयना धरण व परिसराची पाहणी करणार आहेत .

असा असेल दौरा
गुरुवारी 10 डिसेंबर रोजी सकाळी 9.05 वा . जुहू विमानतळ येथून हेलिकॉप्टरने कोयनानगरकडे रवाना होतील . सकाळी 10 वाजता कोयनानगर हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर मोटारीने रत्नागिरी जिल्ह्यातील पोफळी जलविद्युत प्रकल्पाकडे प्रयाण करतील . सकाळी 10.50 वा . पोफळी जलविद्युत प्रकल्प कोयना टप्पा -4 विद्युतगृहाची पाहणी ते करणार असून दुपारी 12.05 वाजता कोयना धरण येथे ते आगमन व परिसराची पाहणी करणार आहेत . दुपारी 2 वाजता मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावरील बोगदा क्र . 2 च्या प्रकल्पस्थळाकडे प्रयाण करणार असून मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते पुसगाव यादरम्यानच्या नवीन मार्गिकेच्या बांधकामाची पाहणी करणार आहेत . 2.50 वा . पॅम्प ऑफिस येथे आगमन व मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली - पुसगाव दरम्यानच्या नवीन बांधकामाचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांना करण्यात येणार आहे .


Post a Comment

Previous Post Next Post