शुध्दीकरण होणार.

 ग्रामपंचायत हद्दीबाहेरील मतदारांची नावे तात्काळ हटविण्याचे आदेश.

मतदार याद्यांचे शुध्दीकरण होणार.PRESS MEDIA LIVE : 

लोणी काळभोर : थेऊर -ग्रामपंचायत हद्दीबाहेरील मतदारांची नावे तत्काळ हटविण्याचे आदेश राज्य निवडणुक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांना दिले आहेत. मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्धीची तारीख (दि. 10) डिसेंबर ऐवजी (दि. 14) डिसेंबर केल्याची माहिती निवडणूक आयोगाने कळविली आहे. यास हवेलीचे तहसिलदार सुनील कोळी यांनी दुजोरा दिला असून ग्रामपंचायत हद्दीबाहेरील मतदारांची नावे वगळण्याबाबत बीएलओ, ग्रामसेवक, कोतवाल तलाठी, मंडलाधिकारी यांना योग्य ते आदेश दिल्याची माहिती कोळी यांनी दिली.

हवेली तालुक्‍यातील लोणी काळभोर, उरुळी कांचन, थेऊर, मांजरी खुर्द, वडकी या ग्रामपंचायतीसह राज्यभरातील बहुतांश ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत, संबधित ग्रामपंचायतीच्या शेजारील गावातील मतदारांची नावे दाखलयाबाबतच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल झाल्या होत्या. दरम्यान निवडणुक आयोगाने दिलेल्या आदेशामुळे, जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या मतदार याद्या शुद्ध होणार आहेत. जिल्ह्यात साडेसातशेपेक्षा अधिक ग्रामपंचायतीसह राज्यभरातील 14,235 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणुका पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणार आहेत.

निवडणुक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीमध्ये, ग्रामपंचायतीच्या हद्दीबाहेरील अनेक मतदारांची नावे आली असल्याची बाब उघडकीस आली होती. सदोष मतदार याद्यांचा सर्वाधिक फटका लोणी काळभोर, उरुळी कांचन, थेऊरसह पूर्व हवेली तालुक्‍यातील अनेक ग्रामपंचायतींना बसला होता. लोणी काळभोर व उरुळी कांचन या दोन्ही बड्या ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत दौंड तालुक्‍यातील हजारो मतदारांची नावे घुसडल्याचे उघडकीस आले होते.

ग्रामपंचायतीच्या राजकारणात काही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ऑनलाइन प्रक्रियेतून आपल्या मर्जीतील गावाबाहेरील मतदारांची नावे मतदार यादीत घुसडली आहेत. याबाबत अनेक तक्रारी जिल्हाधिकारी व निवडणूक आयोगाकडे प्राप्त झालेल्या आहेत. याविषयी काहींनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.निवडणूक आयोगाने हद्दीबाहेरील मतदारांची नावे वगळण्याबाबत स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी कार्यालयांना दिल्यामुळे मतदार यादीत बोगस नावे लावणाऱ्यांना चांगलीच चपराक बसणार आहे.

आदेशामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा
शिवसेनेचे हवेली तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर यांच्यासह राज्यभरातील अनेकांनी मतदार याद्या दुरुस्तीबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच, निवडणुक आयोगाकडे धाव घेतली होती. यावर निवडणुक आयोगाने आदेश दिल्याने, राज्यभरातील चौदा हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

(बीएलओ) क्षेत्रीय तपासणी करुन अहवाल मागविला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था बाहेरील मतदारांच्या नावांची खातरजमा झाल्यानंतर त्याबाबत आदेश पारीत करुन त्यानंतरच हद्दीबाहेरील मतदारांची नावे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतिम मतदार यादी तयार करताना 14 डिसेंबरला हवेलीतील 54 ग्रामपंचायतीच्या अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
- सुनील कोळी, तहसीलदार हवेली


Post a comment

0 Comments