AdSense code ग्राम पंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले.

ग्राम पंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले.

ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले ,  मोर्चे बांधणीला  सुरुवात.


PRESS MEDIA LIVE : पुणे : मोहम्मद जावेद मौला :


पुणेः शिरुर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले असून नुकतेच सरपंच पदांचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरवात केली आहे. निमोणे (ता.शिरुर) येथील सरपंचपद हे सर्वसाधारणसाठी राखीव असल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे. निमोणे येथे सरपंच पदासाठी अनेक जण गुढग्याला बाशिंग बांधुन तयार असल्याने ग्रामपंचायत निवडणूक रंगतदार होणार आहे.

निमोणे गावची लोकसंख्या अंदाजे ५ हजाराच्या आसपास आहे. गावातील मतदान ३७२७ आहे. यात दुबार नावे तसेच मयत व्यक्तींच्या नावांचाही समावेश आहे. गावात ५ वार्ड असून ग्रामपंचायत मध्ये एकूण १३ सदस्य आहेत. त्यामुळे आता सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचीच ग्रामस्थांना उत्सुकता आहे.सरपंचपदाचे आरक्षण झाल्यापासुन इच्छुकांनी जोरदार तयारी चालू केली आहे.


शिरुर-तांदळी रस्त्यावर असणारे निमोणे हे गाव असून गावात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भारतीय स्टेट बँक, पोस्ट ऑफिस, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच विज उपकेंद्र आहे. तसेच गावात दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. त्यामुळे निमोणे गावाला विशेष महत्व आहे. तसेच पूर्वेला घोड धरण आणि पश्चिमेला चासकमानच्या पाण्याचा फायदा या गावातील शेतकऱ्यांना होत असल्याने गावात अनेक सधन कुटुंब आहेत. गावातील काहीजणांचे रांजणगाव औद्योगिक वसाहतीत स्वतःचे व्यवसाय आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीत लाखों रुपयांचा चुराडा होणार असुन सरपंच होण्यासाठी जवळपास १० जण इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. 

Post a comment

0 Comments