खाजगी हॉस्पिटलच्या बिलांची पुन्हा तपासणी होणार.

  खासगी हॉस्पिटलच्या बिलांची  होणार पुन्हा  तपासणी.

 


PRESS MEDIA LIVE :  पुणे : मोहम्मद जावेद मौला : 

पुणे – करोनाचे रुग्ण कमी झाल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांच्या वाढीव बिलांच्या तपासणीसाठी महापालिकेने नेमलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द केली होती. मात्र, या नियुक्‍त्या रद्द करताच; पुन्हा हॉस्पिटलच्या बिलांचा आकडा फुगू लागला आहे. ही बाब समोर येताच खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने बील तपासणीसाठी पुन्हा 35 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 

शहरात आतापर्यंत सुमारे 1 लाख 60 हजार जणांना करोनाची बाधा झाली आहे. बाधितांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात जागा नसल्याने महापालिकेने खासगी रुग्णालये ताब्यात घेतली होती. त्या रुग्णालयांना उपचाराचे दर शासनाने निश्‍चित करून दिले होते. मात्र, त्यानंतरही अनेक रुग्णालयांनी करोना बाधितांची बिले पाच ते दहा लाख रुपयांच्या घरात आकारली होती त्याबाबत केंद्र, राज्यशासन, जिल्हा प्रशासन आणि महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी गेल्या. त्यावर ज्या रुग्णांची बिले दीड लाखांपेक्षा अधिक आहेत, त्या सर्व बिलांची तपासणी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार, सुमारे 70 पेक्षा अधिक बील तपासणीसांची नेमणूक महापालिकेने खासगी हॉस्पिटलमध्ये केली होती

मात्र, महापालिकेची कामे शिल्लक असल्याचे सांगत, पालिकेने या सर्वांच्या नियुक्‍त्या रद्द केल्या होत्या. त्यामुळे खासगी हॉस्पिटल पुन्हा रुग्णांकडून वाढीव बिले आकारण्याची शक्‍यता लक्षात घेऊन पुन्हा पथकाचे नेमणूक करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post