केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रकृती चांगली होण्यासाठी चाहत्यांची देशभर प्रार्थना.

 


 केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रकृती चांगली होण्यासाठी  चाहत्यांची  देशभर प्रार्थना ; सामूहिक बुद्धवंदना.

 उद्या रिपाइं कार्यकर्त्यांचे  आणि भिक्खू संघाचे उपोसथ व्रत - भिक्खू विरत्न  थेर

PRESS MEDIA LIVE :. 

मुंबई दि. 1 - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना झालेली कोरोनाची बाधा दूर व्हावी आणि त्यांची प्रकृती चांगली व्हावी यासाठी उद्या सोमवार दि. 2 नोव्हेंबर रोजी रिपाइं कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने उपोसथ व्रत करून सायंकाळी 6 वाजता  घाटकोपर पूर्व माता रमाबाई आंबेडकर नगर येथिल डी बी पवार चौकातील बुद्धिस्ट मॉनेस्ट्री भिक्खू निवास येथे भिक्खू संघाच्या वतीने बुद्ध वंदना ; उपोसथ व्रत ;  मंगलमैत्री;  परित्राण पाठचे  आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती या कार्यक्रमाचे आयोजक  भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भिक्खू विरत्न आणि रिपाइं चे प्रसिद्धिप्रमुख हेमंत रणपिसे  यांनी दिली आहे.  ना रामदास आठवले यांना कोरोनाची बाधा झाल्याचे कळताच अनेक कार्यकर्त्यांना चाहत्यांना अन्न गोड लागत नाही.अन्नपाणी घेण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे उद्या स्वयंस्फूर्तिने कार्यकर्ते  उपोसथ व्रत करून उपवास करणार आहेत असे रिपाइं चे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी सांगितले. 

  केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना लगेच मुंबईत एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोबत त्यांच्या पत्नी सौ.सीमाताई आठवले यांना ही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता 5 दिवसांनी त्यांची दोघांचीही तब्येत ठीक आहे. चिंता करण्याचे कारण नसल्याचे रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी जाहीर केले आहे. तसेच ना रामदास आठवले यांना आराम करण्याची गरज असून  त्यांना चाहत्यांनी ; कार्यकर्त्यांनी ; रिपाइं च्या नेत्यांनी प्रकृतीची चौकशी करण्यासाठी  थेट फोन करून त्रास देऊ नये असे आवाहन गौतम सोनवणे यांनी केले आहे. 

दरम्यान ना.रामदास आठवले हे कोरोनातून लवकर बरे व्हावेत ; ना. रामदास आठवले हे मूळचे पँथरसारखे  आक्रमक आहेत ते कोरोना ला हरवून विजयी विरासारखे पुन्हा जनसेवेत रुजू होतील.असा  विश्वास देणाऱ्या  देशभरातून लाखो चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव ना रामदास आठवले यांच्या वर करण्यात आला. संघर्षनायक रामदास आठवले यांनी  दिलेला गो कोरोना; कोरोना गो  चा नारा साऱ्या जगात कोरोना विरुद्ध लढणाऱ्या योद्ध्यांसाठी  प्रेरणादायी नारा ठरला आहे. महाराष्ट्राचे गृह मंत्री ना.अनिल देशमुख यांनी तर थेट रामदास आठवले यांच्या शीघ्र कविते च्या स्टाईल मध्ये त्यांना  लवकर बरे व्हा च्या शुभेच्छा दिल्या आहेत." धीर नका सोडू जरी प्रसंग आला बाका; कोरोनात नाही दम इतका कि जो 

लावील तुम्हाला धक्का "अशी कविता पाठवून गृहमंत्री ना अनिल देशमुख यांनी ना रामदास आठवले यांना शुभेच्छा पाठविल्या आहेत. राज्याचे  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सह   देशभरातील अनेक मान्यवर नेत्यांनी ना रामदास आठवले यांना लवकर बरे व्हा यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.  

 दरम्यान आज मुंबईत ना रामदास आठवले यांच्या संविधान निवासस्थानी रिपाइं च्या कार्यकर्त्यांनी आणि आठवले यांच्या कुटुंबीयांनी पूज्य भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो यांच्या उपस्थितीत ना रामदास आठवले यांना चांगले प्रकृती स्वास्थ लाभावे यासाठी  बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी  रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर ;मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे;एम एस नंदा तसेच ना रामदास आठवले यांचे सुपुत्र जित आठवले बहिन शकुंतला आठवले ;सासू नंदा काशीकरया कुटुंबियांसह रिपाइं चे ;प्रवीण मोरे; घनश्याम चिरणकर; प्रकाश जाधव; सतीश निकाळजे; रतन अस्वारे;  देवेंद्र रणपिसे ; आदींनी   बुद्ध वंदनेत सहभाग घेतला. तसेच भिक्खु संघाला चिवरदान केले. 

तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व बुद्ध विहार आणि रिपाइं शाखांमध्ये  तसेच बुधवार पेठ सोलापूर येथील बुद्धीविहारात ना. रामदास आठवले यांना चांगले प्रकृती स्वास्थ लाभावे यासाठी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आल्याची महिती राज्याचे रिपाइं सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी दिली. पुण्यात कोजागिरी पौर्णिमेला रिपाइं कार्यकर्त्यांनी उपोसथ व्रत करून बुद्ध वंदना घेऊन ना रामदास आठवले यांची तब्येत चांगली व्हावी यासाठी प्रार्थना केली असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र रिपाइं सरचिटणीस असीत गांगुर्डे यांनी दिली. तर पंढरपूर येथे दर्ग्यावर चादर चढवून ना रामदास आठवले यांची तब्येत चांगली व्हावी अशी प्रार्थना करण्यात आल्याची माहिती रिपाइं नेते सुनील सर्वगोड यांनी दिली. देशभरतील रिपाइंचे विविध जाती धर्माचे  कार्यकर्ते आपल्या आपल्या धर्मानुसार प्रार्थना करून ना.रामदास आठवले यांची प्रकृती लवकर चांगली व्हावी अशा सदिच्छा व्यक्त करीत आहेत.            

Post a comment

0 Comments