आज पासून ऑनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू.

 

आज पासून ऑनलाईन  अकरावी  प्रवेश प्रक्रिया सुरू.



PRESS MEDIA LIVE :

मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा मार्ग अखेर मोकळा झाला असून  आज पासून ती सुरू हाेईल. सद्यस्थितीत शिक्षण संचालनालयाने नियमित फेरी २चे वेळापत्रक जाहीर केले असून, नियमित फेरी ३ व विशेष फेरीचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल. या प्रक्रियेदरम्यान प्रवेश शुल्क, प्रवेश निश्चिती ऑनलाइन करायची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षण संचालकांनी हे वेळापत्रक अकरावी प्रवेशांच्या https://mumbai.11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे. मुंबई एमएमआर क्षेत्रासह, पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, नागपूर या महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीचे प्रवेश या यापूर्वी एसईबीसी वर्गातून अर्ज भरलेल्यांना प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर वर्ग बदलाची संधी दिली जाईल. नियमित फेरी २ साठी विद्यार्थ्यांना या दरम्यान अर्ज करायचे असून, त्यांना पसंती क्रमही बदलता येतील.

पाच डिसेंबरला जाहीर होणार दुसरी यादी

५ डिसेंबर सकाळी ११.३० वाजता अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, दुसऱ्या नियमित फेरीचे कट ऑफ संकेतस्थळावर पाहता येतील. ९ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना यादीप्रमाणे महाविद्यालयात प्रवेश निश्चिती करता येईल. याच दरम्यान महाविद्यालयांतील व्यवस्थापन व अल्पसंख्याक कोटा प्रवेश सुरू राहणार आहेत. संकेतस्थळावर झालेले प्रवेश नोंदविण्यास कनिष्ठ महाविद्यालयांना अतिरिक्त वेळ दिला जाईल. १० डिसेंबरला तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येईल. 

Post a Comment

Previous Post Next Post