ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ.100 युनिटपर्यंत वीज बिल लवकरच माफ करणार. 

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ.

PRESS MEDIA LIVE : जयसिंगपूर :

जयसिंगपूर येथे पुणे विभाग शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी सभा आयोजित केली होती. यावेळी ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी लवकरच 100 युनिट पर्यंतचे वीज बिल माफ करणार असल्याचे सांगितले. याचबरोबर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कोरोना आला. आणि सर्व व्यवहार बंद झाल्याने सरकारकडे येणारा सर्व कर बंद झाला. त्यामुळे राज्यातील कर्मचार्‍यांना पगारासाठी ६४ हजार कोटीचे कर्ज काढून त्यांचे पगार भागविले. दरम्यान १०० युनिट पर्यंतचे वीज बिल माफ करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगीतले.

यावेळी मुश्रीफ पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने राज्याचे ३८ हजार कोटींचे जीएसटीचे पैसे त्यामुळे केंद्रातील भाजप सरकार राज्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावल्यानंतर राज्यात ३० हजार पदाची भरती करण्यात येणार आहे. याचबरोबर शरद पवार हे आपले नेते आहेत त्यांच्यावर कोण टीका करत असेल तर आपले आपले सर्वच उमेदवार निवडुन आणून भाजपवाल्यांच्या छाताडावर बसण्याची हीच संधी आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी पेटून उठण्याची गरज असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले नाही.

Post a comment

0 Comments