सिंधुदुर्ग


 सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना पुरस्कृत जिल्हा रुग्णालय ओरोस येथे कोवीड 19 मदत कक्ष सुरु.


PRESS MEDIA LIVE :  सिंधुदुर्ग  प्रतिनिधी :


सध्या सिंधुदुर्ग जिल्हयातील कोरोना पोझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे यावेळी जिल्हा रुग्णालयातील कोवीड पोझिटिव्ह रुग्णांना जिल्हा रुग्णालयाकडून आवश्यकत्या सर्व वैदयकिय सेवा देण्यात येत आहेत. परंतु कोवीड पोझिटिव्ह  रुग्ण व नातेवाईक यांना काही अतिरिक्त अडचणी निर्माण होतात. त्यावेळी त्यांना माणुसकीच्या भावनेतून मदत होणे आवश्यक आहे. म्हणूनच आपल्या जिल्हयाचे लाडके खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिवसेना पुरस्कृत जिल्हा रुग्णालय ओरोस येथे कोवीड 19 मदत कक्ष सुरु करण्यात आला असून त्याचे उद्घाटन जिल्हा प्रमुख संजयजी पडते यांच्या हस्ते आज गुरुवार दिनांक 1 ऑक्टोंबर 2020 रोजी करण्यात आले. 

या कक्षाच्या माध्यमातून कोवीड पोझिटिव्ह रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना भेडसवणाऱ्या अतिरिक्त अडचणींच्या बाबतीत पूर्णत: मदत केली जाणार आहे. तसेच या कक्षाच्या माध्यमातून रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अंडी,पपई,सफरचंद इ. दररोज रुग्णांना मोफत देण्यात येणार आहेत. 

या जिल्हा शिवसेना पुरस्कृत कोवीड 19 मदत कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा बॅकेंचे अध्यक्ष सतिश सावंत,युवा नेते शसंदेश पारकर, माजी जि.प.अध्यक्ष विकास कुडाळकर,जि.प.गटनेते नागेंद्र परब, महिला जिल्हा प्रमुख जान्हवी सावंत, कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, कणकवली तालुका प्रमुख शैलेश भोगले, जि.प.सदस्य अमरसेन सावंत, डॉ.प्रविण सावंत,परशुराम परब तसेच शिवसेना विभाग प्रमुख नागेश ओरोसकर आदी शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a comment

0 Comments