सात बारा.


सात बारा मोबाईलवर

 PRESS MEDIA LIVE :   पिंपरी-चिंचवड :

पुणे- महसूल विभागाने महाभूमी या संकेतस्थळावरून सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी ओटीपी बेस लॉगिंगचे सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या संकेतस्थळावर मोबाइल नंबर टाकला की रजिस्ट्रेशन होईल. त्यानंतर मोबाइल क्रमांकावर ओटीपी नंबर येईल. तो नंबर टाकल्यानंतर लगेच डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा मिळणार आहे. नागरिकांना गतीने सातबारा उतारा उपलब्ध व्हावा, यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

राज्यात सातबारा संगणकीकरणाचे काम गतीने पूर्ण करण्यात येत आहे. राज्यात एकूण 2 कोटी 53 लाख सातबारा उतारे असून यातील 2 कोटी 50 लाख सातबारे डिजिटल स्वाक्षरीने उपलब्ध आहेत. ऑनलाइन सातबारा उताऱ्याचे प्रमाण हे 99 टक्के आहे. तर महाभूमी पोर्टलचे राज्यातील वापरकर्ते 2 लाख 56 हजार आहेत. डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा डाऊनलोड करुन घेण्यासाठी प्रति सातबारा उतारा 15 रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे.

संबधित मोबाइल नंबरहून तुम्ही सातबारा उताऱ्यासाठी अधिकची रक्कम भरली असेल, तर ती तुमच्या खात्यातच राहणार आहे. जेणेकरून पुन्हा कधी आवश्यकता वाटल्यास त्या रकमेतून सातबारा उतार अथवा 8 अ चा उतारा काढणे शक्य होणार आहे.

https://digitalsatbara.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारा नागरिकांना डाऊनलोड करून घेता येणार आहे.

डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारा अथवा 8 अ चा उतारा मिळण्यासाठी महाभूमी पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी करावी लागत असे. ही नोंदणी करताना पूर्ण नाव, पत्ता, मोबाइल नंबर, आधार कार्ड क्रमांक, पॅनकार्ड नंबर, ई-मेल आयडी आदी स्वरूपाची सर्व माहिती भरावी लागत होती. तसेच, नोंदणी केलेल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा लॉगीन आयडी व पासवर्ड लक्षात ठेवावा लागत होता. तो विसरल्यास नागरिकांची अडचण होत होती. या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आणि गतीने सातबारा उतारा मिळण्यासाठी मोबाइल नंबर आणि ओटीपी बेस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

– रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी

Post a Comment

Previous Post Next Post