अँटी गुंडा स्कॉड स्थापन करा.


शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी .अँटी गुंडा स्कॉड स्थापन करा .

 खासदार गिरीश बापट.

प्रेस मीडिया लाईव्ह  : पुणे : मोहम्मद जावेद मौला :


पुणे- शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अँटी गुंडा स्कॉड पुन्हा स्थापन करावे, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केली आहे. बापट यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने नवनियुक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मंगळवारी भेट घेतली.

भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर हे यावेळी उपस्थित होते. खासदार बापट यांनी अभिनव गुप्ता यांचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. महिलांसाठी सुरक्षा व्यवस्था वाढवणे याशिवाय हेल्मेट सक्ती ही दाट वस्तीच्या ठिकाणी नसावी. तसेच पोलीस दक्षता समित्या लवकरात लवकर स्थापन कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

शहरातील मुख्य चौकातील भिक्षेकऱ्यांचा प्रश्न सोडवून, नागरिकांना त्यांचा त्रास होणार नाही. यासाठी प्रयत्न करावेत. देव दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना योग्य त्या अटीसह परवानगी देण्याची शिफारस राज्य सरकारला करावी, अशी सूचना बापट यांनी या चर्चे दरम्यान केली. पोलीस दलातील उपायुक्त इतर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राखण्याबाबत आदेश देण्यात यावेत.

वाहतूक सुरक्षतेसाठी आणि अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच “ड्रंक अँड ड्राइव्ह’ करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही बापट यांनी केली. जप्त केलेल्या ज्या वाहनांची तत्काळ विल्हेवाट लावायची आहे त्या वाहनांसाठी जागेचे योग्य नियोजन करावे. या सर्व गोष्टी शहराच्या आणि पुणेकर नागरिकांच्या दृष्टीने तातडीने होणे आवश्यक आहेत. जेणेकरून सुसंस्कृत पुण्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांना मुक्त वातावरण उपलब्ध होण्याला मदत होईल, अशी अपेक्षा बापट यांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post