कुडाळ

 करमळीवाडीत हायमास्टचे उद्धघाटन

PRESS MEDIA LIVE : कुडाळ प्रतिनिधी :

प्रसाद पाताडे.

हुमरमळा वालावल करमळीवाडी गणपती मंदिर समोर माजी पालकमंत्री आमदार दिपक केसकर यांनी कोकण पर्यटन मधुन आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांच्या मागणी नुसार हाय मास्ट मंजुर केल्याने करमळीवाडी ग्रामस्थ व गणपती मंदिर स्थानिक व्यवस्थापन समीती माजी सरपंच सुरेश वालावलकर आणि यांनी आभार मानले. करमळीवाडी येथील जेष्ठ ग्रामस्थ आणि पुरोहित त्रुषिकेश उर्फ बारीश उपाध्ये यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. हुमरमळा वालावल गणपती मंदिर हे ऐतिहासिक कूपिच्या डोंगराच्या पायथ्याशी प्रसिद्ध मंदीर असुन भाविकांबरोबर पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने आमदार वैभव नाईक यानी तीन वर्षापूर्वी गणपती उत्सवात भेट दीली. त्यावेळी माजी सरपंच सुरेश वालावलकर व ग्रामस्थ यांनी मागणी केली होती. त्यानुसार माजी पालकमंत्री आमदार दिपक केसकर आणि खासदार विनायक राऊत यांच्याही प्रयत्नाने हायमास्ट मंजूर केला. आज झालेल्या या कार्यक्रमात मा पचायत समीती सदस्य अतुल बंगे, माजी सरपंच सुरेश वालावलकर, भाऊ गुंजकर, किशोर पेडणेकर, आपा आकलेकर कार्तिक वालावलकर, सुमन वालावलकर, सचिन पेडणेकर, विलास पाटकर, गणपत हिंदळेकर, उमेश वालावलकर, विजय पेडणेकर, गणेश वालावलकर, अजित केसरकर, किशोर वालावलकर, सुशिला वालावलकर, रोहन वालावलकर, महेश पेडणेकर दर्शन हींदळेकर, व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a comment

0 Comments