महत्त्व मोठे आहे

 म्हणूूूनच गांधी विचारांचे सार्वकालिक महत्व मोठे आहे

समाजवादी प्रबोधिनी चे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी


PRESS MEDIA LIVE :  इचलकरंजी 

इचलकरंजी ता.२ , आज शारीरिक व मानसिक हिंसेच्या थैमानाच्या भयानक पार्श्वभूमीवर गांधीजांचा अहिंसा विचार, धादांत  खोटेपणा आणि लबाडीने ग्रासलेल्या फेकुगिरीच्या काळात  सत्याचा विचार , हुकूमशाही पद्धतीने सर्व स्वायत्त संस्था व व्यवस्थांच्या दमनीकरणाच्या काळात लोकशाहीचा विचार आणि शेतीपासून उद्योगधंद्यांच्या उध्दवस्ती करणाच्या कृपर म्हणूनच गांधीविचारांचे सार्वकालिक महत्व मोठे आहे असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एकशे एक्कानावा जन्मदिन आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या  एकशे सतराव्या जन्मदिनानिमित्त चर्चासत्रात समारोप करतांना ते  बोलत होते.प्रारंभी गांधीजीं व शस्त्रीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.प्रारंभी नौशाद शेडबाळे,तुकाराम अपराध यांनीही गांधीजी व शस्त्रीजीं यांच्या जीवनकार्यावर मांडणी केली.त्यातून त्यांच्या विचारांची आजची गरज अधोरेखित केली.यावेळी  हाथरस मधील बलात्कार व क्रूर हत्येचा तीव्र निषेध करण्यात आला.व गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.प्रा.रमेश लवटे,पांडुरंग पिसे,शकील मुल्ला, शंकर भाम्बीष्टे,भीमराव नायकवडी आदी उपस्थित होते.


 फोटो : गांधीजी व शस्त्रीजीं यांना अभिवादन करतांना समाजवादी प्रबोधिनीचे कार्यकर्ते

Post a Comment

Previous Post Next Post