नवसंकल्पनावर मेहनत घ्या. कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे.


 


भारती विद्यापीठ 'आयएमईडी' च्या ‘इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट पार्टनरशीप समिट’ ला चांगला प्रतिसाद  .                                                                                          नवसंकल्पनांवर मेहनत घ्या :कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे .

PRESS MEDIA LIVE : पुणे :

भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट (आयएमईडी)च्या वतीने आयोजित 'इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट पार्टनरशीप समिट’ ला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला. २६ सप्टेंबर रोजी  सकाळी ११ वाजता ही परिषद झाली.भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ माणिकराव साळुंखे यांच्या उपस्थितीत उदघाटन झाले. 

 भारती विद्यापीठ विश्‍वविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता  आणि आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.या परिषदेचे हे आठवे वर्ष होते. व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थी,प्राध्यापक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. डॉ माणिकराव साळुंखे ,महेश एम ,प्रसाद देशपांडे ,चंद्रशेखर चिंचोलकर ,प्रशांत तळमळे,सुशांत देशमुख ,सईद गौस यांनी मार्गदर्शन केले .
'कोरोना विषाणू साथीमुळे जग बदलत आहे.उद्योग आणि व्यवसायांवर परिणाम झाला आहे. जागतिक मंदी आली आहे.ग्राहकाच्या गरजा बदलत आहेत.अशा वेळी नव्या जगाच्या नव्या गरज घेऊन व्यवस्थापन शास्त्र आणि संगणक शास्त्र विद्यार्थ्यांनी नव संकल्पनांवर मेहनत घ्यावी.बदलाला स्वीकारावे,डिजिटल प्रेझेन्स वर भर द्यावा आणि कौशल्ये विकसित करीत वाटचाल करावी',असे प्रतिपादन डॉ माणिकराव साळुंखे यांनी केले. 
'कॉर्पोरेट क्षेत्रही आता बदलणार असून शिक्षण संस्थांना त्याची दखल घ्यावी लागणार आहे. नव संकल्पनांवर इंडस्ट्री कडून पाठबळ मिळत असतेच पण त्यात वाढ करावी लागेल. नवे शाश्वत उद्योगविश्व उभारण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत',असेही डॉ साळुंखे यांनी सांगितले. 
'कुलपती डॉ शिवाजीराव कदम आणि कार्यवाह डॉ विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनामुळे सलग आठ वर्षे या समिट चे  आयोजन होत आहे. उद्योग आणि अर्थव्यवस्थेपुढे नवनवीन आव्हाने उभी राहत असली तरी व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थी आणि इंडस्ट्री यांनी एकत्र येवून, ही आव्हाने पेलून दाखवली पाहिजेत. त्यासाठी विचारांचे आदान प्रदान व्हावे यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली',असे डॉ सचिन वेर्णेकर यांनी सांगितले.   

महेश एम म्हणाले,'इथून पुढे वेगाने बदल होत राहणार आहेत.सर्वाना अधिक मेहनत घेऊन स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे.सतत वेगळेपण जपावे लागणार आहे.नवसंकल्पनांचे व्यावसायिकीकरण करावे लागणार आहे. 

प्रा.दीपक नवलगुंद,प्रा अजित मोरे ,प्रा.डॉ .भारती जाधव,डॉ सोनाली खुरजेकर,प्रा दीप्ती देशमुख ,प्रा.डॉ.शाम शुक्ला,डॉ बलजित कौर,डॉ स्वाती देसाई  आदींनी परिषद यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले                                        
----                                                                                 

Post a comment

0 Comments