जनतेची लूट केली जाऊ लागली आहे


 


ऑक्सीमीटर, मास्क, थर्मल स्कॅनरच्या  किमतीवर कोणाचेच नियंत्रण नाही.

डेड कंपनी च्या नावाखाली बनावट मास्कची ही विक्री ,  ज्यादा दर लाऊन जनतेची लूट.

PRESS MEDIA LIVE  : कोल्हापूर :

कोरोनापासून संरक्षण करणार्‍या मास्क, ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनरच्या किमतीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. ब—ँडेड कंपनीच्या नावाखाली बनावट मास्कचीही विक्री केली जात आहे. ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनरची जादा दराने विक्री करून जनतेची लूट केली जात आहे. एन-95 मास्क 200 ते 250 रुपयांपर्यंत विकले जात असल्याने सामान्य जनतेचा रस्त्यावर मिळणार्‍या स्वस्त मास्क वापरण्याकडे कल वाढत आहे.  सुरुवातीला मास्कबाबत लोकांमध्ये फारसे गांभीर्य नव्हते. साधारणात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून एन-95 मास्कला मागणी वाढू लागली.तेव्हा या मास्कच्या किमती या दोनशे ते अडीचशे रुपये होत्या. कोरोना संसर्ग वाढत गेला तशी मास्कची मागणी वाढू लागली. मागणीप्रमाणे उत्पादन होत नसल्याने बाजारात हे मास्क जादा दराने विकून जनतेची लूट केली जाऊ लागली.

नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने मे महिन्यात या मास्कच्या किमती 40 ते 45 टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे पूर्वीचे जे मास्क अडीचशे रुपयांना विकले जात होते त्याची नियमानुसार किंमत ही 80 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत आली आहे. तर काही मास्क यापेक्षाही स्वस्त दरात उपलब्ध आहेत; पण एमआरपीचा दर एक व विक्रीचा दर त्यापेक्षा जादा अशी स्थिती काही ठिकाणी पाहायला मिळत आहे.

एन-95 मास्क विक्री दरावर नाही कोणाचे नियंत्रण नाही.

सध्या मॅग्नम हेल्थ, यश लाईफ केअर, व्हेनस सेफ्टी हेल्थ, जोसेफ लिसेंट यासह अन्य कंपन्यांचे मास्क कोल्हापुरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 5 थरापासून आठ थरापर्यंतचे हे मास्क आहेत. याच्या किमती या 120 रुपयांपासून 160 रुपयांपर्यंत आहेत; पण अनेक ठिकाणी एन-95 मास्क दोनशे रुपयांपासून अडीचशे रुपयांना विकले जातात.

तीन किंवा त्यापेक्षा जादा थर असणार्‍या मास्कचा वापर हा सुरक्षित मानला जातो. यातून व्हायरसचा शिरकाव होऊ शकत नाही. डॉक्टर्स जेव्हा कोव्हिड पेशंटची तपासणी करत असतात तेव्हा तीन थर किंवा पाच थर असणारे मास्क व तोंडावर शिल्ड लावतात. इतर वेळी एन-95 मास्क वापरूनच रुग्णांची तपासणी करतात.

ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनरच्या गुणवत्ता अन् दरावरही नियंत्रण नाही!

सध्या कोरोना संसर्गाची अनेक लक्षणे आहेत. यामध्ये श्वसनाचा त्रास हे देखील एक लक्षण आहे. सामान्यत: नागरिक श्वसनाचा त्रास होऊ लागला तर शरीरातील ऑक्सिजन लेव्हल तपासण्यासाठी ऑक्सिमीटरचा वापर करतात. हे ऑक्सिमीटर बाजारात 300 रुपयांनाही मिळतात; पण हे ब—ँडेड नाही. चायनीज आहे याची गॅरंटी नाही. त्याचे रीडिंग योग्य नसते असे सांगून त्यापेक्षा दीड हजार रुपयांचे ऑक्सिमीटर ग्राहकाच्या गळ्यात मारले जाते. हीच स्थिती थर्मल स्कॅनरच गनची आहे. कोव्हिडपूर्वी या गनची किंमतही ही पाच ते सहा हजार रुपये असल्याचे सांगितले जात होते. शासनाने किमतीवर नियंत्रण आणले आहे. मार्केटमध्ये एक हजार रुपयांपासून या गन उपलब्ध आहेत; पण दोन ते अडीच हजार रुपयांना याची विक्री होते.

         ...तरीही जनतेची राजरोस पणे लूट.

देशात कोरोनाने जेव्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली, तेव्हा 15 ते 25 रुपये उत्पादन खर्च असणारा एन-95 मास्क 250 रुपयांपर्यंत विकून उत्पादक, आयातदार आणि विक्रेत्यांनी प्रचंड नफेखोरी केली. नफेखोरीचा हा धंदा चव्हाट्यावर आल्यानंतर या विरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली. न्यायालयाने मग केंद्र सरकारला मास्कच्या किमतीवर लगाम घालण्यासाठी कायदा करण्यावर विचार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर बाजारात एन-95 मास्कच्या किमती कमी आल्या असल्या तरी आजही अनेक विक्रेते मनमानी किमतीला मास्कची विक्री करून जनतेची लूट करीत आहेत.

शासनाने एन-95 मास्कचे दर निश्चित केले नाहीत. एमआरपीपेक्षा जादा दराने मास्कची कोणीही विक्री करू नये. तसे होत असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर कारवाई होऊ शकते.

स्वप्ना कुपेकर

प्रभारी सहायक आयुक्त अन्न-औषध प्रशासन

सर्वच नाही; पण बहुतेक नागरिक कापडी मास्क वापरतात. सार्वजनिक ठिकाणी फिरताना तीन थराचे मास्क वापरणे सुरक्षित आहेत. ते नाक व हनुवटीपर्यंत येत असल्याने अधिक सुरक्षित अशा एन-95 मास्कचा नागरिकांनी वापर करावा.

डॉ. अशोक पोळ,

आरोग्य अधिकारी, महापालिका

Post a comment

0 Comments