AdSense code शिरोळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले

शिरोळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले

सांगली कोल्हापूर महामार्गावरील उदगाव टोल नाका येथे शिरोळ तालुका मराठा सकल बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले

PRESS MEDIA LIVE : शिरोळ :

शिरोळ : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण स्थगिती दिली आहे, ती उठवण्यासाठी राज्य शासनाने न्यायालयात भक्कम बाजू मांडावी , आरक्षण निर्णय होई पर्यंत कोणतीही नोकर भर्ती करू नये यामागणीसाठी बुधवारी सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव टोलनाका येथे शिरोळ तालुका मराठा सकल बांधवाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

येत्या दोन ते तीन दिवसांत बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे असे आंदोलनावेळी जि. प .सदस्य डॉ. अशोकराव माने, राजवर्धन नाईक-निंबाळकर, नगरसेवक सर्जेराव पवार, नगरसेवक बजरंग खामकर यांनी प्रसंगी पदाचा राजीनामा देऊ अशी भूमिका जाहीर केली. आंदोलनात मराठा बांधव मोठया संख्येने सहभागी झाला होता.

कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं , छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत भगवे झेंडे हातामध्ये घेऊन आंदोलक सहभागी झाले होते. जोपर्यंत मराठा आरक्षण जाहीर होत नाही, तोपर्यंत कोणताही कर शासनास भरला जाणार नाही अशी घोषणा करण्यात आली. यावेळी पोलीस उपअधीक्षक किशोर काळे, तहसीलदार अपर्णा मोरे यांना मागणीचे निवेदन देंण्यात आले. जाहीर करण्यात आले.

Post a comment

0 Comments