AdSense code कार्य शाळेस प्रतिसाद

कार्य शाळेस प्रतिसाद

संविधानाबद्दलचे भ्रम दूर करण्यासाठी ' संविधान प्रचारक ' तयार व्हावेत: नागेश जाधव


संविधान प्रचारक कार्यशाळेस प्रतिसाद

PRESS MEDIA LIVE : पुणे :

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल आयोजित ' संविधान प्रचारक ' कार्यशाळेस रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला. गांधीभवन ( कोथरूड ) येथे सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत ही कार्यशाळा झाली. संविधानाचे अभ्यासक नागेश जाधव यांनी मार्गदर्शन केले.

 प्रा. नीलम पंडित, सुदर्शन चखाले, सचिन पांडुळे, कमलाकर शेटे यांनी संयोजन केले. ज्येष्ठ कार्यकर्ते अन्वर राजन, संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर यांच्यासह ६o जण सहभागी झाले.

' संविधान निर्मिती ही मोठी प्रक्रिया होती, त्यात देशातील अनेकांचा सहभागी होते.डॉ. आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत, हे संविधान सभेनेच म्हटलेले आहे. तरीही संविधान आणि डॉ.आंबेडकर यांच्या बाबत भ्रम पसरवले जातात. संविधान केवळ एका समाजासाठी नसून सर्व देशासाठी आहे. ' असे प्रतिपादन नागेश जाधव यांनी केले.

ते म्हणाले,'संविधान हे परिवर्तनवादी भारतीय संस्कृतीवर, संकल्पनेवर आधारित आहे.आधुनिक लोकशाही पध्दतीत ते बसवलेले आहे. जगातील चांगल्या गोष्टींचा समावेश त्यात केला आहे. संविधान हे सर्वांनी मिळून, सर्वांसाठी तयार केले आहे, याचा प्रचार संविधान प्रचारकांनी केला पाहिजे. संविधानाची प्रास्ताविका, त्यातील मूल्ये आणि आपल्या जीवनाशी असलेला संबंध, मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्वे हे आपल्याला माहित पाहिजे. त्या शिवाय आपण जबाबदार नागरिक होऊ शकणार नाही.

संविधान निर्मिती करणारे दूरदर्शी होते. स्वातंत्र्य, समानता, बंधुता अशी सगळी चांगली मूल्ये मनात असून उपयोग नाही, ती लिहून ठेवली पाहिजेत , हे त्यांना माहित होते. संविधानाच्या प्रास्ताविकेत संविधानाचे सार आहे. संविधान लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. मातीत रुजवले पाहिजे.त्यासाठी संविधान प्रचारक तयार झाले पाहिजेत, असे आवाहन ही जाधव यांनी केले.

...

Post a comment

0 Comments