आमदाराचे नाव महागात पडले....


आमदारांच्या नावाची नंबर प्लेट लाऊन फिरणाऱ्या वाहन चालकास  पडले महागात.


PRESS MEDIA LIVE :  येरवडा :

येरवडा – कारवर आमदारांच्या नावाची नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या वाहन चालकास महागात पडले. त्याच्याकडून वाहतूक पोलिसांनी साडेपाच हजार दंड वसूल केला. कारवाई होऊ नये म्हणून संबंधिताने आमदारामार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यास न जुमानता येरवडा वाहतूक विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. पडसळकर यांनी कारवाई केली.

करोना पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून विनामास्क वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. जेलरोडवर कॉमर झोनसमोरून कार भरधाव जात असल्याचे वाहतूक पोलिसांना दिसले. त्या वाहनाच्या चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला तरी पोलिसांना न जुमानता ती पुढे गेली. इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने मेंटल कॉर्नर चौकात ते वाहन अडविले.

वाहनचालक महेश कैलास साळुंके (रा. भोसरी) हे आपली विना नंबरप्लेट कार (एमएच 03, 1982) हे भरधाव चालवत असताना येरवडा वाहतूक पोलिसांना दिसले. पोलिसांनी गाडी अडवली असता त्या गाडीच्या मागे आमदार महेशदादा लांडगे असे लिहिले होते.

शिवाय, गाडीवर मागे नंबर टाकला नव्हता, त्याऐवजी “एमडी’ असे लिहून आमदारांचा फोटो लावला होता. गाडीच्या काचादेखील काळ्या होत्या. पोलिसांनी या वाहनावर इन्शुरन्स 2300 रुपये, बेदरकारपणे वाहन चालविणे 1000 रुपये, काळी काच 200 रुपये, नंबर प्लेट नसणे 200 रुपये, लायसन्सजवळ न बाळगणे 200 रुपये व वाहनांवर असलेला पूर्वीचा दंड असा एकूण साडेपाच हजार रुपयांचा दंड साळुंके यांच्याकडून वसूल केला.

 

Post a Comment

Previous Post Next Post