गणित आणि संगीत...


गणित आणि संगीत ‘ विषयावर 'अंकनाद ' तर्फे“ सांगीतिक गणिती गप्पा                                                

  ११ ते १३ सप्टेबर दरम्यान वेबिनार                                                                                                                                                                                तालयोगी पंडित सुरेश तळवलकर,संगीतकार अशोक पत्की, कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचा सहभाग.

PRESS MEDIA LIVE : पुणे. :

'गणित आणि संगीत’ या विषयावर 'अंकनाद ' या अॅपतर्फे 'सांगीतिक गणिती गप्पा' आयोजित करण्यात आल्या आहेत.११ ते १३ सप्टेबर दरम्यान सकाळी ११ वाजता वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारमध्ये तालयोगी सुरेश तळवलकर, संगीतकार अशोक पत्की, कीर्तनकार चारुदत्त आफळे  मार्गदर्शन करणार आहेत. अंकनाद ' अॅपचे निर्माते मंदार नामजोशी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

'अंकनाद’ हे गणिताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणारं  अॅप   आहे. गणित विषय रंजक करुन सांगण्याचे विविध उपक्रम ' अंकनाद ' तर्फे केले जातात.

' गणित आणि संगीत ' हा वेबिनार विनामूल्य असून त्यामध्ये https://zoom.us/meeting/register/tJAsf-ivpjIoHdZkxSLhhWm3K5yKY8Gp9bsU   या लिंक द्वारे सहभागी होता येईल. मिटिंग आय डी  941 8178 9272 हा असून 957366 या पास कोड द्वारे सहभागी होता येईल. 

                या विषयावर पहिला वेबिनार  ९ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट रोजी झाला. त्यात “अनुभूती रिसर्च अँड फाऊंडेशन चे संस्थापक” प्रसाद मणेरीकर , बालभारती च्या बोर्ड ऑफ स्टडीज मेंबर प्राजक्ती गोखले , अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद  चे चेअरमन डॉ. अनिल सहस्रबुद्धे हे मान्यवर सहभागी झाले. या वेबिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

*~अंकनाद अॅपविषयी*~ 

दोन ते तीसचे पाढे घोकून पाठ करणं हे विद्यार्थ्यांना करावं लागतंच. पण या नव्या पिढीला पावकी, निमकी, पाऊणकी हे शब्दच माहीत नाहीत.  ही कोष्टकं म्हणजेच अपूर्णांकांचे पाढे पाठ केले, तर गणिताचा पाया पक्का होऊन जातो. ‘अंकनाद’ मध्ये पाढ्यांबरोबरच ही कोष्टकंसुद्धा साध्या सोप्या पद्धतीने शिकवली जातात.

गणित या विषयाची मुलांना एका नव्या, आकर्षक रुपात ओळख करून द्यावी आणि अवघड वाटणाऱ्या या विषयाशी सहजसोप्या रीतीने मैत्री व्हावी या उद्देशाने 'अंकनाद' ऍपची निर्मिती झाली.

 अल्पावधीतच मुलं आणि त्यांचे पालक यांनी या ऍपला भरघोस प्रतिसाद दिला. 

  विविध उपक्रम आणि कार्यशाळा यांच्या मार्फत  विद्यार्थी, शिक्षक, पालकांसाठी सतत काही नवीन देता यावे हाच अंकनादचा प्रयत्न आहे.                                                                                                                                       

Post a comment

0 Comments