पुणे लॉकडाउन च्या अफवावर. कारवाई करा


पुणे लॉकडॉऊनच्या अफवांवर कारवाई करा : व्यापार मंडलची मागणी

PRESS MEDIA LIVE : पुणे :

संक्रमित झोन वाढल्याने पुणे पुन्हा लॉक डाऊन होणार असल्याची अफवा पसरविणाऱ्यांवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ' ऑल इंडिया फेडरेशन ऑफ व्यापार मंडल ' चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजयसिंह डुबल यांनी केली आहे. शनिवारी पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही मागणी करण्यात आली आहे.

पुन्हा पुणे लॉक डाऊन होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर गेले तीन दिवस  पसरल्या. त्यामुळे व्यापारी, उद्योजकांची धांदल उडाली, काळजी वाढली. लॉक डाऊन होणार नाही असा खुलासा प्रशासनाने केला असला तरी अफवा पसरविणाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई केली जावी, असे विजयसिंह डुबल यांनी पत्रकात म्हटले आहे.                                                                                                                 

Post a comment

0 Comments