नाराज काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांनी...


 नाराज काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद  आणि कपिल सिब्बल यांनी एनडीए मध्ये यावे - 

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले 

PRESS MEDIA LIVE : मुंबई :

 मुंबई दि.2- भाजपचे हस्तक म्हणून अपमानित केलेल्या काँग्रेस च्या नेत्यांनी अपमान सहन करीत न राहता काँग्रेसचा त्याग करावा. देशाच्या विकासासाठी गुलाम नबी आझाद ; कपिल सिब्बल;सारख्या काँग्रेस च्या वरिष्ठ नेत्यांनी भाजप ; आरपीआय आणि एनडीए मध्ये यावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.

 काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांचे नेतृत्व देशाच्या विकासासाठी कमजोर ठरले आहे.काँग्रेस पक्षाच्या बळकटी साठी ज्या नेत्यांनी काम केले त्या वरिष्ठ नेत्यांवर  भाजप चे हस्तक म्हणून संशय व्यक्त करण्याचे काम राहुल गांधी यांनी केल्याचा आरोप होत आहे. काँग्रेस पक्षाला पूर्ण वेळ प्रभावी अध्यक्ष द्यावा यासाठी काँग्रेस च्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. ते पत्र लिहिणाऱ्या  काँग्रेस नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. त्यामुळे असा अपमान या काँग्रेस नेत्यांनी  सहन करू नये .गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासारखा निर्णय घ्यावा. एनडीए मध्ये या नेत्यांचे  स्वागत होईल असे ना रामदास आठवले म्हणाले. 


               ह

         

Post a Comment

Previous Post Next Post