क्रांतीकारी अभिवादन


 क्रांतिकारी अभिवादन.

लाल सलाम लाल सलाम

 भाई विलासराव पाटील याना अखेरचा लाल सलाम


त्यांनी डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते व भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे शिरोळ तालुका चिटणीस म्हणून भाई प्रा डॉ एन डी पाटील सर, दलितमित्र भाई दिनकरराव यादव, भाई बाबासाहेब देसाई यांच्या मार्गर्शनाखाली काम केले होते. शेकापच्या तालुका जिल्हा व राज्य स्तरावरील अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता व शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील होते. ते शेकापच्या अनेक अधिवेशनात व शेतकरी परिषदांमध्ये सहभागी झाले होते. युवावस्थेपासुन ते तहय्यात लाल बावटा चे पाईक होते.

कोल्हापूर व कुरुंदवाड येथे झालेल्या अनेक सत्यशोधक अभ्यास शिबिरामध्ये सहभागी होऊन त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सातत्याने प्रयत्न केले होते.

शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंप बिला विरोधात महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.

त्यांनी 1988 मध्ये निपाणी येथील महाराष्ट्र कर्नाटक सीमा लढया मध्ये अटक व शिक्षा भोगली होती.  

रत्नदीप सह. दूध उत्पादक संस्था (सैनिक टाकळी, ता. शिरोळ) चे विद्यमान संस्थापक चेअरमन होते.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते.

टाकळीतील छत्रपती शिवाजी हायस्कूल नामकरण आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता.

1972 च्या दुष्काळामध्ये रेशन व वेतन बचाव आंदोलनात सहभागी झाले होते.

पुरोगामी विचाराचे पाईक म्हणून त्यांनी देहदान संकल्प केला होता, पण कर्करोग व कोरोना परिस्थिती यामुळे त्यांचे देहदान होऊ शकले नाही.

त्यांच्या निधनाने शेतकरी चळवळ, सहकार, पुरोगामी चळवळ मध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

मुंबई विद्यापीठ प्राध्यापक संघटनेचे कार्यकारी मंडळ सदस्य प्रा. विनोदसिंह पाटील व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विकास पाटील यांचे ते वडील होते, तसेच आशा वर्कर्स युनियन सचिव विजयाराणी पाटील यांचे सासरे होते.

त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, भाऊ, भावजया, पुतणे, पुतण्या, सुना आणि नातवंडे आहेत.


 *भाई विलास पाटील अमर रहे*

Post a Comment

Previous Post Next Post