बेकायदेशीरपणे गुटखा मसाला

बेकायदेशीरपणे गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या वाहनावर जयसिंगपूर मध्ये धडक कारवाई.

एकवीस लाखांचा मुद्देमाल ताब्यात.

जयसिंगपूर पोलिसांची साफळा रचून कारवाई


PRESS MEDIA LIVE : जयसिंगपुर :

बेकायदेरशीपणे गुटखा पान मसाला, सुंगधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जयसिंगपूरमध्ये धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे २१ लाख ५१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून ही कारवाई सांगली-कोल्हापूर बायपास महामार्गावरुन उदगाव (ता.शिरोळ) टोलनाक्यावर मंगळवारी सायकांळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास केली. तर या कारवाईमुळे अवैघ गुटखा विक्री व्यवसाय करण्याचे धाबे दणाणले आहेत. तर विशाल सुनिल हेगडे (वय २६, रा. पिंपळे मैदानाजवळ, हरीपूर ता.मिरज, जि. सांगली), नामदेव आबा ऐवळे (वय २६ रा. नवीन वहसात, टिंबर एरिया सांगली), महेश शामलाल नानवाणी (वय ५२ रा. मार्केट यार्ड सांगली) तर गुप्ताजी (पूर्ण नाव माहित नाही रा. निप्पाणी जि. बेळगाव) या चौघांना जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत जयसिंगपूर पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, मंगळवारी सायकांळी कोल्हापूर-सांगली बायपास महामार्गावरुन आयशर टेम्पो एम. एच. १० सी. आर. १९११ मधून गुटखा पान मसाला, सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळाली होती. यानुसार जयसिंगपूर पोलिसांनी उदगाव टोलनाक्यावर सापळा रचून टेम्पोसह मुद्देमाल व संयशित आरोपीना ताब्यात घेण्यात यश मिळाले.

या कारवाईत ९ लाख ७५ हजार रुपयांचा हिरा पान मसाला लहान पॉउचने भरलेली ७८ मोठी पोती व रॉयल ७१७ तंबाखूचे लहान पॉउच भरलेली ३९ मोठी पोती, १ लाख ३० हजार रुपयांचे हिरा पान मसाल्याचे मोठे पॉउच असलेली १० मोठी पोती व रॉयल ७१७ तंबाखूचे मोठे पॉउच असलेली ४ मोठी पोती, ४१ हजारांचा हिरा पान मसाला लहान पॉउच असलेली ३ मोठी पोती व रॉयल ७१७ तंबाखूचे लहान पॉउच १ पोते, ५ हजार रुपयांचे चिरमुरे भरलेली ५० प्लास्टिकची पोती या अवैध गुटखा व पान मसाला, सुगंधी तंबाखूसह १० लाख रुपयांचा आयशर टेम्पो असा एकूण २१ लाख ५१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. ही कारवाई पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्यासह पोलिस पथकाने केली आहे.

Post a comment

0 Comments