प्रबोधन प्रकाशन.


 प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाच्या `कोरोनाची महामारी` या विशेषांकाचे प्रकाशन सोहळा संपन्न.


लोक प्रबोधनाच्या कार्यात ही सर्वाधिक महत्वाची गोष्ट आहे.. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम अपराध.

 ,

PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :

इचलकरंजी ता.१३,भारतीय राज्यघटनेच्या तत्त्वज्ञानापासून ते कोव्हिडं -१९ च्या संकटापर्यंत आणि भारतीय संस्कृती पासून निरनिराळ्या वैश्विक विचारधारांपर्यंत लोकप्रबोधनाचे अविरत काम समाजवादी प्रबोधिनी करतआहे. प्रबोधनाची सकस  शिदोरी म्हणून गेली एकतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणारे "  प्रबोधन प्रकाशन ज्योती " हे मासिक महाराष्ट व मराठी भाषिकांच्या लोकप्रबोधनात अत्यंत मौलिक भूमिका बजावत आहे. या प्रबोधन चळवळीत आणि विचार जागृतीत  जास्तीत जास्त तरुण कार्यकर्त्यांनी, सजग नागरिकांनी, जिज्ञासू व्यक्तींनी सहभाग घेतला पाहिजे. त्यासाठी समाजवादी प्रबोधिनीच्या उपक्रमात सक्रिय सहकार्याबरोबरच या मासिकाचे वर्गणीदार वाचकही झाले पाहिजे.कारण लोक प्रबोधनाच्या कार्यात  स्वप्रबोधन  ही सर्वाधिक महत्वाची गोष्ट आहे.ती गरज हे मासिक पूर्ण करते असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम अपराध यांनी व्यक्त केले.ते  'प्रबोधन प्रकाशन ज्योती' मासिकाच्या ' कोरोनाची महामारी ' या विशेषांकाचे अंकाचे प्रकाशन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी या अंकाचे संपादक प्रसाद कुलकर्णी होते.

 तुकाराम अपराध पुढे म्हणाले,आज असत्याचा जाणीवपूर्वक डंका पिटला जातो आहे.खोटेपणाच खरा आहे असं दाखविणारी गोबेल्स नीती वापरली जात आहे.माध्यमांच्या अभिव्यक्तीवर सर्व प्रकाराने अंकुश आणला जात आहे.अशावेळी प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिक जी सत्याची कास धरून मांडणी करते ती फार महत्वाची आहे. स्पर्धां परिक्षेच्या विद्यार्थ्यांपासून राजकीय - सामाजिक कार्यकर्त्यांपर्यन्त सर्वाना हे मासिक उपयोगी आहे.


अध्यक्षस्थानावरून बोलताना संपादक प्रसाद कुलकर्णी यांनी या मासिकाच्या वाटचालीचा आढावा घेतला. 'कोरोनाची महामारी ' या विशेषांकाचे अंतरंग उकलून दाखवले.या १३२ पृष्ठांच्या अंकात कोरोना म्हणजे काय ?, कोरोना आणि चीन, कोरोनाचे सामाजिक-राजकीय- आर्थिक परिणाम,कोरोना निमित्ताचे पॅकेज,यासह नवीन शक्षणिक धोरण,इंधन भाववाढ,आंतरराष्ट्रीय राजकारण,कविता आदींसह विविध विषय मांडले आहेत.त्याचे लेखन प्रा.डॉ.जे.एफ.पाटील, प्रा.डॉ.अशोक चौसाळकर,दशरथ पारेकर, प्रा.डॉ.नंदा पारेकर,प्रा.डॉ.पी.एस.कांबळे,डॉ.चिदानंद आवळेकर,नवनाथ मोरे,शुभा शमीम,टीमथी स्नायडर,मुग्धा कर्णिक,विजय चोरमारे, हिमांशू कुमार,भरत यादव आणि प्रसाद कुलकर्णी आदींनी केले आहे.त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.यावेळी प्रा.रमेश लवटे,पांडुरंग पिसे,शकील मुल्ला,प्रशांत लोले विजय पोवार,मारुती कुंभार यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

Post a comment

0 Comments