हुपरी शहर पुन्हा

हुपरी शहर पुन्हा लॉक डाऊन करावे.

हुपरी समाचार चे संपादक वसंतराव ध पाटील.

PRESS MEDIA LIVE : . हुपरी :

हुपरी :  संपूर्ण जगाला कोरोना संसर्गाचा विळखा पडलेला आहे.   हुपरी शहरालाही कोरोना संकटांनी ग्रासलेले आहे. हुपरी तील कोरोना रुग्णांची संख्या चारशेच्या वर गेलेली आहे.  या आठवड्यातच अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असून आंतरराज्य वाहतूक सुरू झाल्याने हुपरीतील चांदी व्यवसायिक परराज्यात रवाना झाले होते, त्यात परतण्यास सुरुवात झाली आहे.

      बाहेरच्या जिल्हा, राज्यातून आलेल्या या व्यवसायिक नागरिकांनी कोरोना  सुरक्षिततेबद्दल आवश्यक ती खबरदारी घेतलेली दिसत नाही शिवाय हे नागरिक शहरात  खुले आम फिरत आहेत, यामुळे त्याचा परिणाम इतर नागरिकांना भोगावा लागत असून त्याचा धोका सुद्धा संभवतो आहे. यासाठी हुपरी नगर परिषदेच्या वतीने पुन्हा एकदा लॉक डाउन करणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन परी समाचार चे संपादक वसंतराव पाटील यांनी केले आहे.

Post a comment

0 Comments