AdSense code सिंधुदुर्ग : कोरोना काळात ग्राहकांचा थम नको.

सिंधुदुर्ग : कोरोना काळात ग्राहकांचा थम नको.

 कोरोना काळात ग्राहकांचा 'थम' नको

रेशन दुकानदारांना थम लावण्याची सवलत कायम राहावी : सुहास हडकर यांनी वेधले विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व आमदार नितेश राणे यांचे लक्ष

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना रास्त भाव धान्य दुकान चालक तथा माजी उपनगराध्यक्ष सुहास हडकर.

PRESS MEDIA LIVE ,: सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी ) :

मालवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानांवरील ग्राहकांना ई पॉस मशीनला थम न लावण्याची जी सवलत शासनाने चार महिने दिली होती तीच सवलत कोरोना काळ संपेपर्यंत कायम राहावी. अशी मागणी मालवण वायरी येथील रास्त भाव धान्य दुकानाचे चालक तथा माजी उपनगराध्यक्ष सुहास हडकर यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, याप्रकरणी आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचेही लक्ष वेधण्यात आले आहे. 

ऑगस्ट महिन्यापासून शासनाने पुन्हा ग्राहकांचा थम घेऊन धान्य वितरित करण्याचा घेतलेला निर्णय धोक्याचा आहे. त्यामुळे कोरोना कालावधीत रेशनिंग ग्राहकांचा ई पॉस मशीनशी थेट संबंध येऊन संसर्गाचा धोका वाढण्याची भीती आहे. तरी ग्राहकांचा थम न घेता मार्च ते जून या कालावधीत जसे धान्य दुकानदार यांचे थम लावून धान्य वितरित करण्याची सवलत मिळाली तशीच सवलत आगामी काही महिने मिळावी. अशी धान्य दुकानदारांची मागणी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या मालवण येथील निवासस्थानी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मालवणचे माजी उपनगराध्यक्ष  सुहास हडकर यांनी भेट घेऊन धान्य दुकानदारांच्या प्रश्नांबाबत निवेदन सादर केले. 

लॉकडाऊन सुरू झाल्यापासुन ते आतापर्यंत धान्य दुकानदार ग्राहकांना सोशल डिस्टनसिंग पाळून व सॅनिटायझर चा वापर करून आवश्यक ती सुरक्षितता बाळगून धान्य वितरण करत आहेत. प्रसंगी २४ तास सेवा बजावत आहेत. ग्राहकांची कोणतीही तक्रार येऊ दिली जात नाही. चांगली व तत्पर सेवा रेशन धान्य दुकानदार देतात. 

एप्रिल ते जून या कालावधीमध्ये शासनाने कोरोना साथीच्या अनुषंगाने ई पॉस मशीनचा वापर थेट ग्राहकांनी न करता धान्य दुकानदाराने थम चा वापर करून धान्य वितरित करण्याचा एक चांगला निर्णय घेतला होता. मात्र ऑगस्ट महिन्यापासून दुकानदाराने थम लावण्याची सवलत शासनाने रद्द केली आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जिल्ह्यातही रुग्ण वाढत आहेत. शासनाच्या निर्णयानुसार एका धान्य दुकानामध्ये जवळपास एक हजार ग्राहक दरमहिना एकाच मशिनला आपला अंगठा लावून जाणार आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत आहे. याबाबत महाराष्ट्र धान्य व केरीसीन संघटना सिंधुदुर्ग जिल्हा संघटना यांनी अन्न व नागरी पुरवठा  नाही. याबाबत मंत्री तसेच संबंधित शासकीय अधिकारी या सर्वांना निवेदने देऊन लक्ष वेधले. मात्र त्याची दखल घेतली गेलेली नाही.

गणेशोत्सवानिमित्त चाकरमानी कोकणात येतात. त्यामुळे ग्राहकांची धान्य दुकानात वर्दळ वाढणार आहे. ग्राहकांनी ई पॉस मशिनल थम लावल्यास कोरोना प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे दुकानदारांनाच थम लावण्याची सवलत कायम राहावी, शासनास हा निर्णय घेण्यास आपण भाग पाडावे. अशी जनतेच्या हिताची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा धान्य व केरोसीन दुकानदार यांच्यातर्फे सुहास हडकर यांनी केली आहे.

Post a comment

0 Comments