आणि तो फसला...

 

आणि तो फसला

तलवारीच्या धाकाने चौघांनी लूटले.

PRESS MEDIA LIVE : पुणे :

गे’ अ‍ॅपवर झालेल्या ओळखीचा फटका एका तरुणाला चांगलाच बसला असून प्रकरण जीवावर बेतता बेतता वाचले आहे. संबंधीत तरुणाला ऑन लाईन मित्राने संबंधासाठी बोलावून तीघांच्या सहकार्याने तलवारीचा धाक दाखवत लूटले. ही घटना नांदेड फाटा रस्त्यावर घडली. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सतिश उमरे यांनी सांगितले की, फिर्यादी तरूण दि. 9 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी ग्राइंडर गे नावाच्या ऍपवर चॅटिंग करत असताना त्याला रवी नावाच्या एकाने हाय मेसेज पाठविला. त्यानंतर फिर्यादीने त्याला कोठे आहे अशी विचारणा केली. त्यावर रवीने डीएसके विश्‍व रस्त्यावर असल्याचे सांगत लैंगिक संबंध साधण्यासाठी एक ठिकाण असल्याचेही सांगितले.

त्यानंतर साडेअकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी डीएसके रस्त्यावर गेला. तेथे त्याला रवी नावाचा तरूण भेटला. त्यानंतर तो त्याला त्याच्या रूमवर घेऊन गेला. दरम्यान, दोघांचा समलैंगिक प्रकार सुरू होणार इतक्‍यात तिघे तलवार काठ्या घेऊन त्यांच्या खोलीत शिरले. त्यांनी फिर्यादीला लाथा बुक्‍यांनी, दांडक्‍याने मारहाण करून तलवारीचा धाक दाखविला.

“ग्राईंडर गे’ अ‍ॅपच्या माध्यमातून तरूणाला लुटल्याचा हा प्रकार आहे. त्याला लुटणाऱ्यांची टोळी असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास येत आहे. याप्रकरणात कट रचून (भादवि कलम 120 ब) मारहाण करून लुटल्याप्रकरणी (भादवि कलम 394) गुन्हा दाखल झाला असून लवकर आरोपी अटक होतील.

– सतिश उमरे, सहायक पोलिस निरीक्षक सिंहगडरोड पोलिस ठाणे

फिर्यादीला त्यांचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली गेली. त्यानंतर घाबरलेल्या फिर्यादीजवळील रोख 10 हजार रूपये, सोन्याच्या दोन अंगठ्या, चांदीच्या दोन अंगठ्या जबरदस्तीने काढून घेतल्या. तसेच गुगल पे द्वारे व एटीएमचा पीन नंबर जबरदस्तीने घेऊन एटीएममधूनही पैसे काढण्यात आले. त्याच्याकडून एकूण 81 हजार रूपयांचा ऐवज लुटला गेला

घटना घडल्यानंतर फिर्यादी प्रचंड घाबरला होता. घरच्यांना कळल्यानंतर संसार मोडेल या भितीने फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती. परंतु ही बाब त्याने आपल्या मित्राला सांगितल्यानंतर मित्राने पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला.

Post a Comment

Previous Post Next Post