AdSense code पुणे विभागातील चार उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या.

पुणे विभागातील चार उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या.

 

पुणे विभागातील चार उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या,

महविकास आघाडीच्या सरकार ने काढला आदेश

PRESS MEDIA LIVE :  पुणे : मोहम्मद जावेद मौला.

पुणे विभागातील चार उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या करण्याचा आदेश महाविकास आघाडीच्या सरकारने काढला आहे. सोमवारी सायंकाळी उशिरा हे आदेश काढण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे . पुणे जिल्ह्यातील विभागीय आयुक्त कार्यालयातील उपजिल्हाधिकारी सीमा होळकर यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल विभागात उपजिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे 

उपविभागीय अधिकारी कोरेगाव कीर्ती नलावडे यांची बदली सातारा येथे पुनर्वसन अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. तर उपविभागीय अधिकारी सोलापूर ज्योती पाटील यांची बदली उपविभागीय अधिकारी कोरेगाव या ठिकाणी करण्यात आली आहे.याचबरोबर उपविभागीय अधिकारी भुदरगड संपत खिलारी यांची बदली सोलापूर येथे अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

                  पाच तहसीलदारांच्या बदल्या

पुणे विभागातील पाच तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे येथील पुनर्वसन कार्यालयातील तहसीलदार विवेक साळुंके यांची बदली सोलापूर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. शुभांगी फुले पुनर्वसन तहसीलदार सातारा यांची बदली पुणे येथे सर्वसाधारण शाखेत करण्यात आली आहे. तर उपप्रबंधक एमआरटी तहसीलदार दिगंबर रौंदळ यांना या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली आहे. पुणे येथील पुनर्वसन कार्यालयातील तहसीलदार सुरेखा दिवटे यांना विभागीय आयुक्त कार्यालयातील पुनर्वसन कार्यालयात नियुक्त करण्यात आले आहे. तर सचिन लंगुटे तहसीलदार आटपाडी यांना सोलापूर येथे सर्वसाधारण शाखेत नियुक्त करण्यात आले आहे.

Post a comment

0 Comments