पुणे. फुरसुंगी कचरा डेपोचा प्रश्न पावसाळ्यात पुन्हा पेटला

 

फुरसुंगी कचरा डेपोचा प्रश्न  ऐन   पावसाळ्यात  व कोरोना संकटात पुन्हा पेटला. ग्रामस्थांचे आंदोलन सुरू.

PRESS MEDIA LIVE :

पुणे :  ( प्रतिनिधी ) : पुण्यातील फुरसुंगी कचरा डेपोचा प्रश्न ऐन पावसाळ्यात आणि कोरोना संकटात पुन्हा पेटला आहे. फुरसुंगीचा कचरा डेपो कायमस्वरुपी हटवावा यासाठी या गावातील नागरिक आक्रमक झाले आहेत. कचरा डेपो हटाव कृती समितीनं स्वातंत्र्य दिनापासून बेमुदत आंदोलन हाती घेतल्याने प्रशासनाची डोके दुखी वाढली आहे. फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावातील नागरिकांनी हे आंदोलन सुरु केलं आहे.  दोन गावांतील लोकांनी सुरुवातीला गांधीगिरी करत करचा डेपोच्या वाहन चालकांना गुलाबपुष्प दिले. त्यानंतर पावसात त्यांनी कचरा डेपोच्या प्रवेशद्वारावर जोरदार निर्दर्शने केली. टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावातील ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे पुण्यात कचऱ्याचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे.

एकिकडे पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच पावसाळा सुरु आहे. अशा परिस्थितीत शहरात कचरा साठल्यानंतर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यातच काही दिवसावर गणेशोत्सव आहे. कोरोना काळात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांना कचऱ्याची समस्या भेडसावणार आहे. कचरा डेपो हटवण्यासंदर्भात ग्रामस्थ तीस वर्षापासून अग्रही आहे. मात्र, अद्याप यावर कोणताही तोडगा निघाला नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आहे.

Post a Comment

Previous Post Next Post