पुणे. गणेश विसर्जना निमित्त..





 गणेश विसर्जनानिमित्त गर्दी करू नये म्हणून मनपा आणि पोलिसांनी बंदोबस्त केला आहे.

PRESS MEDIA LIVE :

पुणे - गणेश विसर्जनानिमित्त मंगळवारी (ता. १) गर्दी करू नये म्हणून महापालिका आणि पोलिसांनी बंदोबस्त केला आहे. नदीपात्र, घाट आणि जेथे हौद आहेत, त्यासाठी ठिकाणी पोलिस बंदोबस्त राहणार आहे. त्यामुळे लोकांनी गर्दी करू नये, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी पुन्हा केले. या संदर्भात पोलिस आयुक्तांशी चर्चा केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शहरात यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करतानाच विसर्जनासाठी महापालिकेने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार घरगुती गणपतीचे घरीच; तर सार्वजनिक मंडळांनी मंडपातच मूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.उत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात भाविकांनी रस्त्यावर गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. दीड दिवसासह पाचव्या आणि सातव्या दिवशी नदीपात्र, घाटांवरही काही जणांनी विसर्जन केल्याच्या तक्रारी आहे. यानिमित्ताने अनंत चतुर्दशीला अशा घटना घडणार नाहीत आणि लोक रस्त्यावर येणार नाहीत, याचे नियोजन महापालिकेने केले आहे. नदीपात्र, घाट आणि हौद असलेल्या ठिकाणी लाकडी बांबू उभारून रस्ते बंद केले आहेत. ते काम पूर्ण झाले असून,या ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांची नेमणूक राहणार आहे, असेही महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.

पुणेकरांनी संपूर्ण उत्सव साधेपणाने आणि काळजी घेऊन साजरा केला आहे. मात्र, उत्सवातील सर्वांत महत्त्वाच्या टप्पा म्हणजे विसर्जनाचा आहे. प्रत्येकाने सुरक्षिततेला प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी सहकार्य करावे.

- मुरलीधर मोहोळ, महापौर

Post a Comment

Previous Post Next Post