महाड इमारत दुर्घटनेत एन डी आर एफ आणि प्रशासनाने


महाड इमारत दुर्घटनेत एन डी आर एफ आणि प्रशासनाने उत्कृष्ट बचावकार्य केले -

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंनी रायगड जिल्हा अधिकारी निधीचौधरींचे केले कौतुक
PRESS MEDIA LIVE : मुंबई :


मुंबई दि. 26 -रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये तारिक गार्डन ही इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. मात्र इमारत कोसळण्याची  दुर्घटना घडल्यानंतर तातडीने रायगड जिल्हा प्रशासन;पोलीस;आणि एन डी आर एफ टीमने समन्वय करुन उत्कृष्टपणे बचावकार्य केले.  मदत कार्य केले. त्यात अनेक राहिवसीयांचे जीव वाचविण्यात आल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी रायगड च्या जिल्हा अधिकारी निधी चौधरी आणि सर्व प्रशासनाचे अभिनंदन केले.

महाड  इमारत दुर्घटनेतील बचवकार्या ची ना रामदास आठवले यांनी जिल्हा अधिकारी निधी चौधरी  यांच्याशी दूरध्वनीद्वारे माहिती घेतली. त्यावेळी बचावकार्य चांगले केल्या बद्दल एन डी   आर एफ आणि जिल्हा अधिकारी निधी चौधरी यांचे ना.रामदास आठवले यांनी कौतुक केले. 

   तारिक गार्डन या इमारतीचे बांधकाम निकृष्ट होते त्यामुळे ती इमारत कोसळली. इमारत हलु लागताच इमारतीतील रहिवासी बाहेर पडले अन्यथा मोठी जीवित हानी झाली असती तरी अद्याप या दुर्घटनेत 14  लोक मृत्यूमुखी पडले आहेत. अनेक जण जखमी आहेत. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच या  दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना सांत्वनपर किमान 10 लाखांची मदत करावी  अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.                 


    

Post a comment

0 Comments