AdSense code कोल्हापूर, कोकण, अलिबाग.

कोल्हापूर, कोकण, अलिबाग.

 येत्या २४ तासात कोकणासह पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा

PRESS MEDIA LIVE :.  कोकण, कोल्हापूर , अलिबाग ;

       कोकणातील काही ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून सर्वाधिक पाऊस कोयनेतील नवजा येथे ३२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. येत्या २४ तासात कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.गेल्या २४ तासात कोयना (नवजा) ३२०, महाबळेश्वर, शिरगाव २१०, दावडी,राधानगरी १९०, वाल्पोई १६०, चांदगड १५०, ताम्हिणी १७०, कणकवली, पोलादपूर, संगमेश्वर, देवरुख, सावंतवाडी, आजारा १२० मिमी पावसाची नोंद झाली होती. विदर्भातील सिरोंचा, अहिरी, महागाव, मराठवाड्यातील हिमायतनगर, किनवट, माहूर येथे जोरदार पाऊस झाला. सोमवारी दिवसभरात महाबळेश्वर येथे ४८, डहाणु ५४, सांताक्रुझ १८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कोल्हापूर - पंचगंगा नदी इशारा पातळीवर, आलमट्टीचा धोका टाळण्याचा प्रयत्कोल्हापूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला आहे. मंगळवारी पंचगंगा नदीने इशारा पातळीवर पोहचली आहे. काळम्मावाडी व राधानगरी या दोन्ही मोठ्या धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्याने पुराचा धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने सावधगिरीचा इशारा देत लोकांचे स्थलांतर सुरू केले आहे. राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग वाढण्यात आला आहे. तर, अलमट्टीचा धोका टाळण्याचा प्रयत्न आजही मंत्री पातळीवरून सुरू राहिला.पूरग्रस्त गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. एनडीआरएफचे पथक करवीर तालुक्यातील चिखली गावात पोहचले असून, हे पथक आणि स्थानिक प्रशासन यांच्यावतीने लोकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दवंडी पिटवून दिल्या जात आहे. सायंकाळपर्यंत पंचवीस टक्के लोकांचे स्थलांतर झाल्याचे तहसीलदार शीतल मुळे - भामरे यांनी सांगितले.


अलिबागकडे जाणाऱ्या चाकरमान्यासाठी खूषखबर ! येत्या २० आॕगस्टपासून रो-रो सेवा सुरु होणार सुरु

        कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान जरी घातले असले तरीही अनलॉकिंगच्या नुसार काही गोष्टी सुरु करण्यास आता सरकारने परवानगी दिली आहे. याच दरम्यान आता दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी बहुसंख्येने नागरिक मुंबईसह विविध शहरातील नागरिक हे कोकणात जात आहेत. नागरिकांना कोकणात जाता यावे यासाठी एसटी बस आणि आता विशेष 5 रेल्वे गाड्या सुरु केल्या आहेत. याच दरम्यान आता अलिबागकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे. कारण अलिबाग, मांडवा येथे ज्यांची जायची इच्छा आहे त्यांच्यासाठी येत्या 20 ऑगस्ट पासून रो रो सेवा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. *T

Post a comment

0 Comments