पिंपरी चिंचवड :कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस कडक  लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.  महापौर माई ढोरे.
  

PRESS MEDIA LIVE :. पिंपरी चिंचवड :

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्याबाबत आयुक्तांना सूचना केल्यास असून त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती महापौर माई ढोरे यांनी दिली.

करोनासंदर्भातील माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत महापौर बोलत होत्या. यावेळी पक्षनेते नामदेव ढाकेही उपस्थित होते. लॉकडाऊनसंदर्भात अधिक बोलताना महापौर म्हणाल्या, किमान दहा ते पंधरा दिवस लॉकडाऊन करण्याची गरज आहे. नागरिकांचा जीव अत्यंत महत्त्वाचा असून त्याबाबत निर्णय घेण्यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा केली.मात्र आज (शुक्रवारी) सकाळी पुण्यात पालकमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत लॉकडाऊनसंदर्भात घाई करू नका, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्याची माहिती आयुक्तांनी दिली. मात्र शहरात दिवसेंदिवस वाढणारी करोना बाधितांची संख्या पाहता गांभिर्याने निर्णय घेण्याची गरज असल्याचे महापौर म्हणाल्या.सलग लॉकडाऊन घोषित करणे शक्‍य नसल्यास गुरुवार आ णि रविवार या दोन दिवसांमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात यावे, अशी आमची भूमिका आहे. त्याबाबत आपण आयुक्तांशी चर्चा करून आठवड्यातून किमान दोन दिवस लॉकडाऊन करावे, अशी सूचना केल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.

Post a comment

0 Comments