AdSense code इचलकरंजी :

इचलकरंजी :


 इचलकरंजी : आज ठरणार लॉकडॉऊन वाढणार की शिथिल करणार  ?


PRESS MEDIA LIVE  : इचलकरंजी : ( मनु फरास ) :

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहर 14 जुलैपर्यंत लॉकडाउन केले आहे. त्यापुढे लॉकडाउनचा कालावधी वाढवायचा की शिथिलता द्यावयाची, याबाबतचा निर्णय उद्या (ता. 13) होण्याची शक्‍यता आहे. दुपारी साडेबाराला व्हिडि ओ कॉन्फरन्सिंगद्वारे शहर नियंत्रण समितीची बैठक होईल. यात चर्चा करून लॉकडाउनबाबतचा पुढील निर्णय घेतला जाणार आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शहर नियंत्रण समितीने 14 जुलैपर्यंत 100 टक्के लॉकडाउन जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यात सलग 72 तास लॉकडाउन झाल्यावर पाच तास शिथिलता दिली होती. भाजीपाला व किराणा साहित्य खरेदीसाठी ही सवलत दिली होती. पण, भाजी खरेदीवेळी सोशल डिस्टन्सिंग न पाळता त्यामुळे समूह संसर्गाचा धोका निर्माण झाल्याने मंगळवारी (ता. 14) भाजीपाला बाजार भरण्यावर प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले. मात्र, गल्लोगल्ली फिरून भाजीविक्रीचा पर्याय प्रशासनाने उपलब्ध करून दिला आहे. दुसरीकडे 14 जुलैला लॉकडाउनची मुदत संपणार आहे. त्यामुळे लॉकडाउनबाबत पुढील कोणता निर्णय घ्यायचा, याबाबत शहर संनियंत्रण समितीची उद्या दुपारी बैठक होणार आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. शिवाय, बैठकीस उपस्थित असलेल्या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होणार आहे. चर्चेत नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, पोलिस अधिकारी, महसूल अधिकारी, ज्येष्ठ नगरसेवक सहभागी होणार आहेत. सध्या लॉकडाउनची मुदत वाढविण्याबाबत मतभेद आहेत. विशेष करून उद्योग क्षेत्रातून लॉकडाउनला विरोध आहे. अद्यापही कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण रोज आढळून येत आहेत. त्यामुळे आणखी काही दिवस लॉकडाउनची मुदत वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. त्यामुळे 100 टक्के लॉकडाउन करणार की त्यातून शिथिलता देणार, याकडे लक्ष लागले आहे. गर्दी केली होती.

Post a comment

0 Comments