प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
नागपूर :- मानवतेला काळमी फासणारी घटना घडली आहे आरोपी आणि महिला हे एकामेकाला मागील एक वर्षापासून ओळखत असुन पती हे कामावर गेल्यानंतर महिलेने आरोपीला घरी बोलावले आणि दारू आण्यासाठी पाठविले दोघांनी मिळून दारू घेतली यावेळी आरोपीनी महीलेला शरीर सुखाची मागणी केली महिलाने नाकार दिल्याने आरोपीने महिलाला धक्का दिला खाली पडताच महिलांच्या कामातुन रक्त स्राव सुरू झाले रक्त निघाल्याने आरोपी घटनास्थळावरून पसार झाला नंतर लक्षात आले कि आपले मोबाईल तेथेच विसरले परत आल्यावर महिलेने जोर जोरात ओरडु लागली या वेळी आरोपीने ओढणीने महिलेचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिचे कपडे काढून मृतदेहावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोहित गणेश टेकाम (वय-२५, रा. पारशिवनी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हुडकेश्वर पोलिसांनी शनिवारी दुपारी आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आले आहे
मिळालेल्या माहितीनुसार, हुडकेश्वर खुर्दमधील आनंदनगरात ३३ वर्षीय महिला पती व १० वर्षाच्या मुलीसह राहत होती. गुरुवारी ६ फेब्रुवारीला सकाळी महिलेचा पती हॉटेलमध्ये वेटरचे काम करण्यासाठी गेला तर मुलगी शाळेत गेली होती. सकाळी ११.३० वाजता या महिलेला तिच्या ओळखीचा युवक आरोपी रोहितचा कॉल आला. तिने त्याला भेटण्यासाठी घरी बोलावले.
परंतु, काही अंतरावर गेल्यानंतर आरोपी रोहितला आपला मोबाईल महिलेच्या घरात विसरल्याचे समजल्यामुळे तो पुन्हा महिलेच्या घरी गेला. रोहित पुन्हा आल्याचे पाहून महिलेने पुन्हा आरडाओरड सुरु केली. त्यामुळे आरोपी रोहितने ओढणीने महिलेचा गळा आवळून तिचा खून केला. खून केल्यानंतर आरोपी रोहितने महिलेचे कपडे काढून तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने महिलेला कपडे घातले आणि घटनास्थळावरून पळ काढला.
शवविच्छेदन अहवालात महिलेसोबत बलात्कार झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी हुडकेश्वर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर व त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास केला असता आरोपी रोहित महिलेच्या घरी आल्याचे त्यांना समजले. आरोपीला अटक करून त्याची शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.