रिक्षा चालकाची आत्महत्या.

 



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर -रिक्षा चालक अशोक गुंडा पाटील (वय 55.रा शिवाजी पार्क सध्या रा.विक्रमनगर  ,को.) याने  बुधवार ता.01/05/2024 रोजी सकाळी  10 च्या सुमारास अयोध्या पार्क येथील संगम टॉकिजच्या परिसरात असलेल्या झाडाला नॉयलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.त्यांच्या नातेवाईकांनी गळफास सोडवून त्याला बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.याची फिर्याद प्रविण लक्ष्मण पाटील (भाचा.रा.शिवाजी पार्क को.) याने सीपीआर पोलिस चौकीत दिली.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकित झाली आहे.

अधिक माहिती अशी की ,मयत अशोक पाटील  यांचे कुंटुबिय पुणे येथे रहात असून हे विक्रमनगर येथे एकटेच रहात होते.ते आपला उदारर्निवाह रिक्षा चालवून करीत होते.रात्री जेवण करून विक्रमनगर येथे पायी चालत आले असता त्यानी मध्यरात्रीच्या सुमारास एका झाडाला नॉयलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.सकाळी तेथील नागरिकांनाच्या हा प्रकार निदर्शनास आला.या घटनेची माहिती शाहुपुरी पोलिसांना समजताच पोलिसांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात पाठविला.त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.याची नोंद शाहुपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post