विशेष वृत्त : प्रत्येक नागरिकांनी आपला मताधिकार बजावा !!!.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - 18 वी लोकसभा निवडणुका दोन टप्प्यात पार पाडली असून तिसरा टप्पा 7 मे.ला पार पडत आहे.मतदान पुर्ण झाले की निकालाची उत्कंठा सर्वाना लागून रहाणार आहे.याचे कारण म्हणजे निवडणुकीच्या निकालातुन राज्या बरोबर देशात सत्तांतर घडून येते.

त्याचे चांगले आणि वाईट परिणाम समाजावर आणि लोकांच्यासह देशावर पडतात.याची जाणीव ठेवून नागरिक आपल्या मताधिकाराचा निवडणुकीत वापर करतो.तर काही जण प्रवाहात वाहुन आपल्या मताचा हक्क बजावतात. तर काही जण निश्क्रीय भावनेतुन आपल्या मताधिकाराचा वापर करत नाहीत.यात प्रामुख्यांने रोजची रोजी-रोटी कमावणारयां पासुन ते  हायफाय वर्गाप्रर्यतचा समावेश .

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाने मतदानाचा अधिकार कोणताही भेदभाव न करता सर्वाना मिळवून दिला आहे.मताधिकार हा "एक मत एक मुल्य आणि एक व्यक्ती "अशा समानतेचा पुरस्कार केल्याने काहीनी त्या वेळी देशातील प्रस्थापित वर्गाचा आक्षेप होता.ते म्हणायचे ज्यां लोकांना मताची किंमंत समजत नाही अशांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मताचा अधिकार देऊन काय साध्य करणार? असा प्रश्न करून मताचा अधिकार फक्त  ठराविक वर्गाला यावा असा युक्तीवाद करायचे यावर त्यावेळी संविधान सभेत चांगलाच वाद विवाद व्हायचा .पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या युक्तीवादा पुढ़े  न्यायिक टिकाव लागला नाही.त्यातुनच सर्वाना मताधिकार प्राप्त झाला.त्यावेळच्या एका  पक्षाच्या नेत्यात आणि डॉ.आंबेडकर यांच्यात एक संवाद चर्चेत होता.सर्वाना मताचा अधिकार दिल्याने डॉ. आंबेडकर यांचा राग राग करायचे .जे राग करायचे ते डॉ.आंबेडकरांना म्हणायचे तुम्ही सर्वाना मताचा अधिकार प्राप्त करून दिला त्यात तुमच्या अस्पृश्य समाजाचाही समावेश आहे.

अशा मतदारांना आम्ही पैशाच्या मोबदल्यात विकत घेऊन  निवडणुका जिंकून आम्ही सरकार स्थापन करू म्हणजे तुम्हाला सर्वाना मताधिकार दिल्याचा दुष्परिणाम समजेल.यावर रोखठोक बोलताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले " ज्या वेळी या लोकांना आपल्या मताचा अर्थ समजून त्याची किंमंत कळेल ,त्याच वेळेस तुमचा पैसाही त्यांचे मत विकत घेऊ शकणार नाही ,त्यावेळी तुम्हाला त्यांच्या पुढ़े मतांची भिक मागावी लागेलत्या वेळी तुमच्या सारखा महाभिकारी या देशात दुसरा कोणी नसेल ".ही शक्ती त्यांना डॉ.आंबेडकर यांनी लिहीलेल्या संविधानाने प्राप्त झाली आहे.ते समाजाला म्हणतात तुमचे मत म्हणजे काडीमोल समजू नका.याची किंमत ज्या वेळी तुम्हाला समजेल त्या वेळी सत्ताधारी वर्ग ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे असे धनवान लोक तुमचे मत विकत घेताना अवघड जाणार आहे.या देशात निवडणुका सुरु झाल्या पासून त्याची टक्केवारी कमी असून लोकांच्यात मतांची जनजागृती होण्यासाठी निवडणुक आयोगा पासून सेवाभावी संस्था मार्फत जनजागृती करीत आहेत. तसेच 15 जानेवारी हा दिवस मताधिकार दिवस म्हणुन साजरा केला जातो . 

 तरीही मताची टक्केवारी वाढली नाही.अशी टक्केवारी वाढ़णे म्हणजे लोकांच्या निवडणुकप्रक्रीयेत अधिकाधिक सहभाग होऊन कल्याणकारी राज्य उभारणीच्या दिशेने वाटचाल राहील हेच डॉ.आंबेडकरांना अभिप्रेत होते.म्हणुन या देशाचे एक नागरिक म्हणून आपण सर्वानी ही जबाबदारी 18 वी लोकसभा निवडणुक पार पाडली पाहिजे.कारण आज आपल्या देशात लोकशाही व संविधान विरोधी धर्माध व जातीयवादी शक्ती उफाळुन आल्या आहेत.अशा शक्तीवर मात करायची असेल तर त्याला मताधिकार हाच एक उपाय आहे.

राजकारण हे जीवनांच्या आणि समाजाच्या प्रत्येक क्षेत्राला प्रभावित करतो.हे सर्व नागरिकांनी लक्ष्यात घेतले पाहिजे.म्हणुन प्रत्येकाने आणि स्वतः कर्तव्य भावनेतुन मताधिकाराची जबाबदारी पार पाडत इतरांनाही मताधिकार बजाविण्यास भाग पाडले पाहिजे.यातच तुमचे -आमचे आणि देशाचे एक नागरिक म्हणून  सर्वाचे हित आहे.

Post a Comment

Previous Post Next Post