खळबळ जनक बातमी : बनावट नोटा छपाई करून विक्री करण्यारया टोळीचा छडा.

शाहुपुरी पोलिसांची  जोरदार  कारवाई.

सुत्रधारासह 7 जणांना ताब्यात घेऊन त्यात कोल्हापूरातील एकाचा समावेश.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून पाचशे रुपयांचा बनावट नोटाचा सुळसुळाट झाला होता.त्यातच एका एटीएम मशीन मध्ये अनोळखी व्यक्तीने 500/रुपयांच्या 20 नोटा भरल्याची घटना घडली होती.शाहुपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक    अजयकुमार सिंदकर यांनी आपल्या पथकासह पुणेसह पुण्यातील परिसरात छापेमारी करून बनावट नोटा तयार करणारी यंत्रसामुग्रीसह इतर साहित्य जप्त करून टोळीचा पर्दापाश केला.

महाराष्ट्रासह अन्य राज्यात त्यांचे जाळे पसरलं होतं या कोल्हापूर पोलिसांच्या बेधडक कारवाई मुळे सदर टोळीचा भांडाफोड करण्यात यश आले.       या कोल्हापुरात सापडलेलया बनावट नोटा प्रकरणी शाहुपुरी पोलिस ठाण्यात त्या बँकेच्या व्यवस्थापकांनी फिर्याड़ दाखल दिल्याने अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गु न्हा दाखल केला होता.याचा तपास करीत असताना कोल्हापुरातील खाजगी सावकराचा मुलगा यात समावेश असल्याची माहिती पोलिसांना  मिळाली असता त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली सुरु केली .     

  या बनावट नोटाचे जाळे पुणे -मुंबई असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत यातील मुख्य सुत्रधासह सात जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी करत असल्याने काही दिवसांत या टोळीचा छडा लागणार असल्याचे पोलिसांच्या कडुन सांगण्यात आले.या बनावट नोटा प्रकरणी पुण्यातील सराईताचा समावेश असून छापण्याच्या यंत्र सामुग्रीसह पाचशे रुपयांच्या नोटाही जप्त केल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post