अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी आरोपीस तीन वर्षाची शिक्षा.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश के.बी.अग्रवालसो यांनी  सुरेश हिंदुराव कांबळे (वय 52.रा.गोळीबार मैदान,क.बावडा) याला तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.सरकारी वकील म्हणून Ad. अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिले.

अधिक माहिती अशी की,पीडीत मुलगी ही अल्पवयीन असून आरोपी हा पीडीत मुलीच्या कुंटुंबाचा ओळखीचा असल्याने त्याची त्या घरात ये-जा होती.पीडीत मुलगी घरी स्वंपाक करीत असताना आरोपी त्यांच्या घरी येऊन कोच बसून वाईट नजरेने पाहत होता.पीडीत मुलीची आई घराच्या पाठीमागे भांडी घासत बसली होती.आरोपी हा तिच्या आईशी बोलून जातो असे सांगून त्या मुलीशी जवळ येऊन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करु लागल्याने पीडीत मुलीने आरोपीच्या विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात ता.17/08/21 रोजी फिर्याद दाखल केली असता पोलिसांनी सुरेश कांबळे याला अटक करून गुन्हा दाखल केला होता.पोलिसांनी त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.सदरचा खटला जिल्हा सत्र न्यायाधीश के.बी.अग्रवालसो यांच्या कोर्टात चालून सरकारी वकील Ad.अमिता कुलकर्णी यांनी 5 साक्षीदार तपासून साक्षीदारांनी दिलेली साक्ष आणि सरकारी वकील यांनी केलेला जोरदार युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य मानुन जिल्हा सत्र न्यायाधीश के.बी.अग्रवालसो यांनी आरोपी सुरेश कांबळे याला दोषी ठरवून तीन वर्षे सक्तमजुरी आणि एक हजाराचा दंड आणि  दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.या गुन्हयाचा तपास शाहुपुरी पोलिस ठाण्याचे तत्कालीन महिला उपनिरीक्षक श्रीमती एस.एस.पाटील यांनी केला .सरकारी वकील म्हणून AD.अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिले .त्यांना या कामात तत्कालीन  सहा.पोलिस उपनिरिक्षक सुरेश परीट ,पोलिस शंकर माने यांनी मदत केली.

Post a Comment

Previous Post Next Post