२७९ इचलकरंजी मतदार संघात मतदान जनजागृतीसाठी ५० किलोमीटर अंतराच्या सायकल रॅलीचे आयोजन.

 



सहा. निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले.

प्रेस मीडिया लाईव्ह :

 सार्वत्रिक लोकसभा निवडणुक -२०२४ करीता मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने सर्वत्र विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ४८ लोकसभा मतदारसंघाच्या सहा. निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये सुद्धा स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती साठी विविध उपक्रम राबविणेत आले आहेत.

या अनुषंगाने रविवार दि.२८ एप्रिल रोजी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात ५० किलोमीटर अंतराच्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी  ६.०० वाजता शहरातील शिवतीर्थ येथून सायकल रॅलीचा  शुभारंभ  उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या हस्ते करणेत येणार आहे.

         मंगळवार दि. ७ मे २०२४ रोजी सर्वांनी लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान करावे असे आवाहन या सायकल रॅलीच्या माध्यमातून करणेत येणार आहे.

     सायकल रॅलीची सुरुवात शिवतीर्थ  येथून होणार असुन त्यानंतर - खोतवाडी - तारदाळ - कोरोची - कबनुर - चंदुर ते परत शिवतीर्थ असा ५० किलोमीटर प्रवास करत शिवतीर्थ येथे मतदान जनजागृती सायकल रॅलीची सांगता होणार आहे. 

        या मतदान जनजागृती साठी आयोजित सायकल रॅली मध्ये  शहरातील आय. एम.फिट क्लब, रिंगण फिटनेस, टीम अर्जुना, टीम भारत, टीम उदय सर,एक.के.फिटनेस,आर.बी.सी.

गृप, मॉर्निंग गृप, सह्याद्री सायकल क्लब, सायकल क्रेझी, स्वस्त रहे मस्त रहे, निलेश फिटनेस क्लब, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी युनिकोड, राजाराम वॉकर आदी सहभागी होणार आहेत.

         सायकल रॅलीच्या माध्यमातून मतदारांनी मतदाना साठी स्वयंस्फुर्तीने प्रेरीत होऊन त्यांना राज्यघटनेने दिलेला पवित्र हक्क १००% बजावावा  असे आवाहन  सहा.निवडणुक

 अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांनी केले आहे.


   

Post a Comment

Previous Post Next Post