सामाजिक कार्यकर्ते सुभाष शेट्टी यांचा वाहतुक शाखेच्या वतीने सत्कार.



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

  कोल्हापूर शहर वाहतूक शाखेला वाहतूक नियंत्रण करण्यासाठी विना मोबदला सेवा देणारे सामाजिक कार्यकर्ते व ट्रॅफिक वार्डन सुभाष शिवलिंग शेट्टी यांच्या कामाची दखल घेऊन सत्कार करण्यात आला. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी शाल श्रीफळ, प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला.

   सुभाष शेट्टी हे गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळ कोल्हापूर शहरात स्वच्छता, व वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी स्वयप्रेरणेने काम करीत आहेत. या कामाच्या मोबदल्यात ते कोणताही मानधन मागत नाहीत. पण तरीही काही लोक त्यांना चहा, पाणी, जेवन व औषधोपचारासाठी पैसे देतात. त्यांची पत्नी चिमावती शेट्टी या गतीमंद असून सध्या शेट्टी यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींसह लोकांनी त्यांना पुढे येऊन आर्थिक मदत करण्याची गरज आहे.

  संत गाडगे महाराज यांच्या विचाराने प्रेरीत झालेल्या सुभाष शेट्टी यांनी १९९८ पासून कोेल्हापुरात स्वच्छतेला प्रारंभ केला. तुंबलेले नाले, गटारी स्वच्छ केल्या. ज्या ठिकाणी कचरा दिसेल तेथे जाऊन एकट्याने स्वच्छता केली. महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या या कामाचे कौतूक केले. दोन वेळच्या महापुरात शाहूपुरीतील त्यांचे घर पुराच्या पाण्यात गेलेले असताना लोकांना त्यांनी मदत केली. सार्वजनिक गणेशोत्सव बंदोबस्तात दरवर्षी त्यांचा पोेलीसांच्या बरोबरीने सहभाग असतो. त्यांच्या याच कामाची दखल घेऊ अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी प्रमापत्र देऊन त्यांचा सत्कार केला आहे.


कोल्हापूर : ट्रॅफिक वॉर्डन सुभाष शेट्टींचा सत्कार करताना पो.नि. नंदकुमार मोरे व इतर..

Post a Comment

Previous Post Next Post