सावकारकीचा पाश करतो जीवनाचा नाश.

 

प्रेस मीडिया लाईव्ह ;

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर-शहरात आणि ग्रामीण भागात सावकारकी फोफावत चालली आहे.यावर कारवाई करणारयांचा अंकुश रहात नसल्याचे दिसून येते.काही जण घरच्या गरजासाठी किंवा औषधोपचार,मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी सावकाराकडुन व्याजाने पैसे घेत असतो.

पण काही सावकार याचा गैरफायदा घेऊन व्याज मुद्दल देऊन ही व्याजाला चटावलेल्या सावकार कर्जदाराचे जगणे मुश्किल करून टाकत आहे.पैशासाठी तगादा लावणे ,सारखा सारखा फोन करून त्रास देणे तर काही वेळा मारहाणीच्या प्रकार ही घडलेला आहे.पण कर्जदार अब्रुला भिऊन तक्रार करीत नाही.जर तक्रार केलीच तर गंभीर पणे याची दखल घेत नाहीत.म्हणुनच आत्महत्या हत्या शिवाय कर्जदारापुढ़े पर्याय नसतो.याच कारणातुन कितीतरी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.त्याच्या घरच्यांना अजून तरी न्याय मिळाल्याचे उदाहरण नसल्याचे नागरिकांतुन बोलले जात आहे.गुरुवारी असाच  प्रसंग रिक्षा चालकाच्या कुंटुबांने अनुभवला म्हाडा कॉलनीत रहाणारा सावकराकडुन फुलेवाडी परिसरातील शाहू चौकात रहाणारा अमित उदयकुमार पाटील यांनी खाजगी सावकाराकडुन कर्ज घेतले होते.त्या कर्जाच्या बदल्यात रिक्षा ओढ़ून नेल्या मुळे त्यांने आत्महत्येचे पाऊल टाकलं आणि संपूर्ण कुंटुब उघड्यावर पडलं त्याच्या पत्नीने अस्मिता पाटील यांनी संबंधित सावकारा विरोधात फिर्याद दाखल केली.

पोलिसांनीही सावकारा विरोधात गुन्हा दाखल केला पण त्या कुंटुबांला कितपत न्याय मिळतो त्यांच्यावर अंवलबून असल्याचे नागरिकांच्यातुन बोलले जात आहे.जर खरोखरच कारवाई करणारयां यंत्रणेला या घटना रोखायच्या असतील तर      अशा त्रास देणारया सावकरावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.जेणे करून कोणताही सावकार कर्जदाराला त्रास देणार नाही.तसेच काही कर्जदारांचे सावकाराकडे चेकबुक ,कोरे स्ट्य्ंप पेपर ,बँकेचे सेव्हिंग्ज पासबुक ,संबंधिताचे एटीएम कार्ड दिलेले असते.त्याचीही कर्जदाराला भिती असते.कारवाई करणारे म्हणतात भिऊ नका तक्रार द्या पण त्या तक्रारीवर कारवाई होण्या एऐवजी नंतर कर्जदारालाच सावकरापुढ़े सामोरे जावे लागते.तरी अमित सारख्या कर्जदाराच्या आत्महत्या रोखायच्या असतील समाजातील असलेली सावकरकी पुर्ण मोडीत काढ़ली पाहिजे तरच कुठे तरी अशा घटनाना  आळा बसेल.

Post a Comment

Previous Post Next Post